प्रेम... असा व्यक्ती आहे का ज्याला प्रेम आवडत नाही ? मी म्हणतो असा कोणीच नाही. वयाच्या १६व्या वर्षी मला प्रेम झाला , 1७व्या वर्षी ती माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि मी २२पर्यंत तिच्या आठवणीतच राहिलो ,तिने तिकडे दुसऱ्याला choose करून टाकलं आणि मी तिची वाट पाहत राहिलो. कारण माझं असं मानणं होतं की एकदा प्रेम केलं की ते पुन्हा होणार नाही किंवा मी करणार नाही. अचानक माझ्या लाईफ मध्ये एक दुसरी मुलगी येते आणि सगळं काही असं झटक्यात change करून टाकते जणू काही माझा past होताच नाही. मी तिच्या जवळ जायला घाबरतो कारण मी माझ्या past ला , स्वतःला promise केलं होतं की तिच्याशिवाय दुसरं कोणी नाही. पण असं नसते ना भावा!!!ती गेली मग तू सुद्धा दुसरी पाहा ना ,ती विसरली ना,मग तू सुद्धा... ते फक्त movie मध्ये होते रे , आपण वाट पाहतो आणि ती परत येते ,असे काही मित्र म्हणाले आणि काही त्यांचं काहीच चुकलेले नाही.
मग मी दुसऱ्या मुलीकडे focus केलं आणि मी माझ्या past लाग विसरून गेलो ,मला हळू हळू तिच्यासोबत comfortable वाटू लागलं. पण मी कुठेतरी lack करत राहिलो आणि त्या मुलीला सुद्धा आता दुसरा मुलगा पसंद आला आणि जेव्हा आता ही दूर गेली तेव्हा मला आता तिच्याशी प्रेम झाला आहे आणि हे भयंकर आहे.
तुम्ही म्हणत असाल हे चालू काय आहे ? but आता इतका तर समजला यार की प्रेम पुन्हा होऊ शकते. हो ते नसेल पहिल्या प्रेम सारखं किंवा दुसरा सुद्धा भेटणार नाही पण होऊ शकते प्रेम पुन्हा भेटेल. फक्त या होणाऱ्या changes साठी स्वतःला तयार करा लागेल नाहीतर एकावरच focus राहा लागेल जर तेच पाहिजे आणि मग त्याच्यासोबत येणारे उन्हाळे पावसाळे,प्रेम,विरह, तिच्या chukya आणि होऊ शकते तेच भेटेल पण यावेळेस मात्र समर्पण असेल समोरच्या कडून तर त्याला निवडा.
एकंदरीत शेवटी सगळं ठीक होईल आणि जर नाही होईल तर हे अंत नाही.