जानेवारी चा महिना, सांजे धुकेदार सर्दी;
नऊ वर्षांची पोर, अन समोर चिकार गर्दी.
अभिनंदन ! अभिनंदन !
करत येत जात होती मंडळी,
करशील सुखाचा संसार अशी संतवणा देत.
संसार म्हणजे काय प्रश्न पडे तिच्या मनी
आई म्हणे काळजी नको करूस,
भेटलाय तुला तुझ्या नसीबचा धनी..
बाबा म्हणे नवरा मुलगा काम-धंद्याचा हाय
पोरगी सुखाने राहील , आता मला काळजी काय !
आजी ?
मला तर करताही नाही येत भाजी ,
सर्व लोक म्हणतात सुखाचा संसार करशील , सुखाचा संसार करशील
हा नेमका संसार कोण आनि आहेतरी काय ,
जे अजून मला कधी कडलच नाही..
माझी लाडकी पोर
ठरलय तुझ लग्न
लग्नाच्या भारात इतके झालेत सर्व मग्न
की तुझी कोणी संजूतच नाही काढली की काय असत लग्न..
लहानपणी तू शिकलिश,
आधी हताला चटके मग मिळते भाकर,
लग्न झाल की कधी कधी छटाका कधी भाकर
कधी दोन्ही , कधी दोन्हीही नाही.
हककसाठी लढलीस तर सर्व ठरवतील तुला जाही
हक्क आणि शांती कधी एकत्र येत नाही
पन तुला दोघांना एकत्र सोबत घेऊन स्वताला घडवायच आहे वाही
सुखाचा संसार म्हणजे फक्त ऐकण , ऐकवण नाही
पण आजी,
हा कसला सुखाचा संसार
ज्यात माझे स्वप्नच नहोत..
स्वप्न ही होतील पूर्ण तुझे ,
फक्त समजदार असला पाहिजे तुझा धनी
तू त्याला दे प्रतिष्ठा आणि प्रेम
साथ देशील त्याला आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,
तो देणार तुला त्याच सर्वस्व , ठेवणार नाही तुला कसलीच कमी
पन आजी, का ठरलंय माझ लग्न
इतकी कसली घाई
इतकी जड झालीये का मी तुम्हाला
मला कोणी एकदाही विचारल नाही.
लग्न काही इतकही वाईट नाही
हळू हळू समजेलच तुला सर्व काही
पन कधी करावा लागेल स्वार्थत्याग, कधी संयोजन
प्रत्येकदा तुझ्या मणाचच होईल असंही नाही
आजी तू आत्ताच असंही बोलत आहेस आत्ताच तसंही
खर सांग मला मार्ग निघेल का यातून काही?