मृत्यू सुद्धा आधी सौंदर्याचीच निवड करतो की काय असे मधुबाला कडे पाहून वाटते. काही सौंदर्य शापीत सौंदर्य म्हणून लक्ष्यात राहतात. प्रत्येक क्षेत्रात यशोशिखरावर काही व्यक्ती आजरामर झालेल्या आहेत. सौंदर्य म्हंटलं की मेनका,मरलीन मन्रो, मोनालिसा, आठवतात.मधुबाला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय सुंदर, प्रतिभाशाली आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम देहलवी होते. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील "सौंदर्याची राणी" म्हणून ओळखली जात.
चांगल्या क्षणाबद्दल चांगल्या व्यक्तीबद्दल आपली भावना अशीच असते की जीवनात ही घडी अशीच राहू दे,पण ती राहत नाही.
कर्तुत्व, सौंदर्य या इतिहास घडविणाऱ्या बाबी आहेत. लताचा सुमधुर आवाज हे गायनातील सौंदर्यच आहे. मधुबाला सौंदर्य हे सौंदर्यातला सूर आहे.
माणसांनी कितीही काळ गाजविला तरीही एक दिवस काळ त्यांच्या वर घाला घालतोच.
सगळेच सौंदर्य घेऊन जन्माला येत नाहीत कोणी विचाराचं सौंदर्य तर कोणी आचाराचं सौंदर्य घेऊन येतात किंवा आपल्यात रुजवतात. सौंदर्य हे हिमनगाच्या टोकासारखं असतं, वरवर लोभस हवहवसं वाटणारं सुंदर पण खाली काय दडलय, मनात काय दडलय याचा थांगपत्ता लागत नाही.बाह्य सौंदर्यामुळे एकत्र आलेली मनें मनाच्या आंतरिक सौंदर्या शिवाय एकत्र राहूच शकत नाहीत.
मधुबालाचा जन्म दिल्लीमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील अयातुल्ला खान हे एका चित्रपट स्टुडिओत काम करत असत. कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूपच हलाखीत होते. त्यामुळे मधुबालाला लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. त्यांनी ९ व्या वर्षी ‘बसंत’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले
१९४७ मध्ये ‘नील कमल’ चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू केला. पण १९४९ मध्ये आलेल्या ‘महल’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्या नंतर त्यांनी ‘मुगल-ए-आझम’, ‘बरसात की रात’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘चालाक’, ‘हावडा ब्रिज’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं.
त्यांची सौंदर्य, अभिनयकौशल्य आणि स्क्रीनवरची उपस्थिती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असे. त्यांना भारतातील मर्लिन मुनरो असंही म्हणलं जातं.
मधुबालाचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं, परंतु दिलीप कुमार यांच्याशी त्यांचं नातं सर्वाधिक गाजलं. दोघांचं प्रेम खूप प्रसिद्ध झालं होतं, पण काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. नंतर त्यांनी गायक आणि अभिनेता किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं, पण त्यांचं वैवाहिक जीवन फारस यशस्वी ठरलं नाही.
मधुबालांना जन्मतःच हृदयाचा त्रास होता. त्यांना हृदयात छिद्र होतं (hole in the heart). १९६० नंतर त्यांच्या प्रकृतीत खूप बिघाड झाला. त्यांनी शेवटचा चित्रपट १९६४ मध्ये केला. अखेर २३ फेब्रुवारी १९६९ रोजी, अवघ्या ३६व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
मृत्यूनंतरही मधुबाला भारतीय चित्रपटसृष्टीत अमर आहे. तिचं सौंदर्य, अभिनय आणि करुण आयुष्य अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे.
मधुबालाचं सौंदर्य केवळ देखणं नव्हतं, ते दिव्य होतं. तिचा चेहरा इतका मोहक आणि निरागस होता की प्रेक्षक केवळ तिच्याकडे पाहत राहायचे. तिचं हास्य खास ओळख असलेलं, ती हासली की संपूर्ण पडदा उजळून जायचा. तिच्या डोळ्यांमध्ये भावनांची एक अमर्याद खोली होती.प्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा (Hollywood Director) यांनीसुद्धा तिला "The Venus of Indian Screen" असं संबोधलं होतं.
काही गीतं अमर होतात,जणू मधुबालाच्या सौंदर्याला साजेशी गाणी लिहिली गेली.
मधुबालावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ती जशी दिसायला सुंदर होती, तशीच तिच्यावर चित्रित झालेली गाणी देखील अतिशय गोड, भावनिक आणि सुरेल होती. तिच्या अभिनयात वेदना आणि प्रेम यांचा संगम दिसतो.मधुबाला ही केवळ एक अभिनेत्री नव्हती, ती एक भावना होती – तिचं सौंदर्य, तिचा अभिनय, तिच्यावर चित्रित झालेली गाणी... हे सगळं आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.
मधुबालाचं सौंदर्य आणि गाणी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मधुबालाचं सौंदर्य केवळ देखणं नव्हतं, ते दिव्य होतं. तिचा चेहरा इतका मोहक आणि निरागस होता की प्रेक्षक केवळ तिच्याकडे पाहत राहायचे. तिचं हास्य खास ओळख असलेलं, ती हासली की संपूर्ण पडदा उजळून जायचा. तिच्या डोळ्यांमध्ये भावनांची एक अमर्याद खोली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा (Hollywood Director) यांनीसुद्धा तिला "The Venus of Indian Screen" असं संबोध़लं होतं.
सौंदर्य गाण्याला जन्म देतं असेच मधुबाला बद्दल म्हणता येईल सौंदर्या शिवाय काव्य स्फुरत नाहीअसेच म्हणावे लागेल.मधुबालावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ती जशी दिसायला सुंदर होती, तशीच तिच्यावर चित्रित झालेली गाणी देखील अतिशय गोड, भावनिक आणि सुरेल होती.
“प्यार किया तो डरना क्या” मुगल-ए-आझम (1960)
ताजमहालप्रमाणे अजरामर झालेलं हे गाणं. मोगल सम्राटाच्या दरबारात अनारकली (मधुबाला) आपलं प्रेम धाडसाने कबूल करते.
सौंदर्य आणि अभिनयाची जुगलबंदी मुगले आजम मध्ये पाहायला मिळते.
आजारी असतानाही लोखंडी साखळ दंड बांधून मधुबालाने वेदनेचा भाव आपल्या चेहऱ्यावर आणला. अभिनय आणि सौंदर्याचा अविष्कार यामध्ये तडजोड नसतेच.
“आइये मेहरबान” हावडा ब्रिज (1958)
एक सेक्सी, सॉफ्ट आणि मोहक गाणं. मधुबालाचं सौंदर्य आणि हावभाव यात अफाट आकर्षण होतं.
“एक लडकी भीगी भागी सी” चलती का नाम गाडी (1958)
किशोर कुमारसोबतच्या या धमाल गाण्यात मधुबालाचं खेळकर रूप दिसतं.“जिंदगी भर नहीं भूलेगी” बरसात की रात (1960)
एक हळवं आणि रोमँटिक गाणं, जे मधुबालाच्या सौंदर्याला भावनिक स्पर्श देतं.“मोहब्बत की झूठी कहानी पे रोये” मुगल-ए-आझम (1960)
एक हृदयस्पर्शी गाणं, जिथे तिच्या अभिनयात वेदना आणि प्रेम यांचा संगम दिसतो.
काही गाणी सौंदर्याला जन्म देतात तर काही सौंदर्य सुंदर गाण्याला जन्म देतात.
सुंदर पडलेली स्वप्नें आपल्याला जगण्याचे बळ देतात. स्वप्नें आपली नसली तरीही आपल्याला आनंद देतात.
स्वप्नं म्हणजे भयाण वाळवंटातलं. मृगजळ होय. जगणं म्हणजे काय शेवटी मृगजळाच्या मागे धावणंच होय.
मृगजवळ फसवं असलं तरीही जगण्याला बळ देतं. काही सौंदर्य आपलं नसलं तरीही आपल्याला जगण्याचे बळ देतात.