Photo by Amin Hasani on Unsplash
काय करावे सुचत नव्हते खिडकीत येऊन बसले होते
मनात विचार सुरु होते सगळीकडे शांत होते
वाऱ्याची एक झुळूक आली माझे विचार घेऊन गेली
ढगांची दाटी झाली पाखरे गाणी गाऊ लागली
रिमझिम वर्षा सुरु झाली माती चिंब भिजून गेली
सुगंध मातीचा दरवळला सर्वत्र मुले आली खेळायला एकत्र
मी विचारले ढगाला का रे रडतोस एवढा
तो म्हणाला, तो म्हणाला अगं वेडे हे तर माझे आनंदाश्रू
ते बघ तिथे नाचत आहे वासरू
माझे हे अश्रू आहेत खूप अनमोल थोडा तरी तुम्ही ठेवा याचा मनात मोल
ऐकून वाटली खूपच खंत पाण्याविना जगाचा नाही होऊ अंत
खरोखरच पाणी आहे वरदान इंद्र देवाचा राखू आपण मान