हल्ली खुप nostalgic झाल्यासारखं वाटतं . मला एक वर्षाची मुलगी आहे. तिच्याकडे पाहून वाटत असावं . तिचं हसणं , खेळणं सतत आठवण करून देतं; माझ्या बालपणीची. माझं बालपण फार लाडात गेलं . माझ्या मुलीचंही तितक्याच लाडात जात आहे. म्हणूनच कदाचित. तिचा जन्म झाला तेव्हा sleepless nights, लंगोट बदलणे, burping, etc. इतकं करावं लागायचं कि अगदी चिडचिड सुरु व्ह्यायची . मग एकाच विचार यायचा कि आपल्या आई बाबांनी कसं बरं केलं हे सगळं manage. ते पण एकदा नाही तर दोनदा. आई बाबांना salute करावं वाटतं. त्यांच्याबद्दल अजून respect निर्माण होतो. म्हणूनच म्हणतात ना आपण आई बाबा झाल्याशिवाय आपले आई बाबा कळत नाहीत. खरं आहे ते.
मी लहान असताना सतत कोणीतरी सोबत खेळायला. कधीच एकटेपणा जाणवला नाही. अगदी एक वर्षाची असताना सुद्धा. आता माझ्या मुलीला पण मित्र मैत्रिणी आहेत पण तो मोकळेपणा जाणवत नाही. म्हणून nostalgic झाल्यासारखं वाटतं . घरात खेळवायचं म्हणलं तर मोबाइल,TV पासून दूर ठेवा. त्यांना addiction नाही झालं पाहिजे. Freedom कमी आणि restrictions च जास्त. खायला पण हे द्या , ते नाही, etc. थोडक्यात काय तर आत्ताच्या बाळांना आपल्यासारखं स्वछंद जगणं जमणार नाही. Rather ती संधीच आता उपलब्ध नाही. आपण प्रयत्न करत राहायचा.
आयष्यातला साधेपणा कमी होत चालला आहे. Facebook, Instagram , वर तर status upload करणं duty झाली आहे. लोकं फिरायला जातात तर त्यांचे photos upload करतात . मग peer pressure खाली आपण पण फिरायला जातो. परवडत नसेल तरीही. नाही जमलं जायला तर compare करतो , ती किती फिरते, तो किती फिरतो आणि आपण घरीच. त्यानीच depression येत असावं लोकांना . सगळं असूनही नसल्याची भावना depression चं कारण ठरते . लहान लहान मुलांना पण depression येतं म्हणे . हि आई बाबांची नवीन काळजी कि मुलांचे मानसिक आरोग्य पण जपा . आम्हाला तर हे शब्दच माहित नव्हते. किती गोष्टींपासून मुलांना जपा .
आताच्या काळात आई बाबा होणे सोपे नाही. त्यांना qualitative जीवन देणे म्हणजे आई वडिलांची कसरत च. Nuclear family मुळे अजुन अवघड होऊन बसले आहे. माझे बालपण आजी , आजोबा, मामा , मामी असे सगळ्यांसोबत गेले. आता पाहिलं तर आई वडिल आणि मुलं . एवढेच . मुलं day care मध्ये राहतात. त्यांना नक्कीच एकटेपणा जाणवत असणार. खरंच किती tension free होतं आपलं बालपण. पैशाचं महत्त्व तेव्हा सुद्धा होतं आज सुद्धा आहे . पण माणसाच्या गरजा आधी १० होत्या तर आज १०० आहेत. म्हणूनच सगळे गणित बिघडते. Ambitious असणं वाईट नाही पण family ला, health ला जर वेळच नाही देता आला तर मग आयुष्याला काय अर्थ. ३ idiots movie मध्ये virus बोलतो ना ' life is a race', खरं आहे ते. Global warming , world wars , growing automation , या सगळ्या चिंतांमुळे nostalgic व्हायला होतं . कि अज्ञानातच सुख असतं ! तुम्हाला पण nostalgia होतो का ?