Photo by Artem Kovalev on Unsplash

मी एकटीच बरी,
या अद्वितीय आठवणीत,
प्रत्येक रिकाम्या क्षणी,
मी एकटीच बरी.

एकांतात, मला स्वतःच सांत्वन करण्यासाठी,
शांततेच्या या जगात, मी विचारांना आलिंगन देण्यासाठी,
कडू गोड आठवणीत रामण्यासाठी,
या क्षणी, मी एकटीच बरी!

पण कधी कधी, रिकाम्या जगात हेच एकटेपण कुजबुजते,
न बोललेले शब्द प्रतिध्वनी होऊन ऐकायला येते.
मग, हळूच कुठेतरी मनात विचारांना पालवी फुटते,
आणि स्वतःलाच मी पुन्हा विचारते,
खरंच, हे एकटेपण गरजेचे असते?

मग हळू हळू, एकटेपणा, पावसा सारखा ओसरू लागतो,
कधीनव्हे ते हा पावसाळी क्षणभंगूर अतिथी ह्रिदयात छोटासा कप्पा करून जातो,
दुनियादारीच्या या जगात आपण परत भानावर येतो,
दैनंदिन नित्य कामात आपण पुन्हा रमून जातो.

खरं आहे. एकटेपणा तेव्हा वाटत नाही, जेव्हा आपण खरंच एकटेच असतो,
सर्वजण असताना सुद्धा आपण कधीकधी एकटेच असतो.
सोबत असेल कुणाचीतरी, तरच हा एकटेपणा नाहीसा होतो,
आज मी खरंच माझ्या एकटेपणात रमले होते,
आज मी एकटीच बरी होते!
आज मी एकटीच बरी होते.

.    .    .

Discus