Image by Anushri Shrimant Baral

एकदा बसले असताना अचानक मनात विचार आला. आपण आपल्या आयुष्यात खूप साठवणार्या गोष्टी करतो, फिरतो, खातो, खेळतो, बागडतो. मग म्हटलं चला, "आज मनाच्या खोलवर जाऊया," आणि ठरलं! प्रवास चालू केला मनाच्या खोलवर जाण्यासाठी... प्रथम लख्ख प्रकाश होता, पण जसे एक-एक पायरी उतरू लागले तसे प्रकाश हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. आता आलेच होते इतक्या लांब, तर माघार घ्यायची नव्हती. कसबस चाचपडत का होइना चालत होते, आणि अचानक काहीतरी पायाला लागलं, हात लावून पाहिलं तर खूप साऱ्या गाठी. विचार केला पण काही समजेनं मग म्हटलं, "चला था गाठी सोडवूयात तरी," एक गाठ सोडली की दूसरी गाठ बांधली जात होती. खुप प्रयत्न केला. अचानक लख्ख प्रकाश पडला आणि कुठून तरी आवाज आला, ते होतं, मन जे या जगाशा नात्यांमध्ये गुंफलं गेलं होतं.

मग लक्षात आलं, आपण एवढ्या लोकांना बोलतो, भेटतो आणि न कळतो त्यांना दुखावतो. एक नात तयार करतो आणि दुसर नात सहज तोडून टाकतो हे नसतं की आयुष्य एकदा आहे.

या सगळ्या गाठी सोडवल्या आणि परतीचा प्रवास चालू केला आणि एक नव्या जगात प्रवेश केला जिथे सर्वांना एकमेकांना बोललं, मतभेद न करता समजून घेतलं आणि जिथे गाठी नाहीत तर नाती आहेत...

Expectations हा 12 अक्षरांचा शब्द नसतो, पण तो खूप काही आहे. आपण नेहमी म्हणतो माणसापेक्षा प्राण्यांनी बरं केलेली मैत्री कधीही चांगली नाही... हे तर दडलं आहे, त्यात प्राण्यांना जीव लावताना आपण त्यांच्या कडे कधीच कोणती अपेक्षा करत नाही, कि बदलल्यात तेही आपल्याला प्रेम देतील, जर हीच जर भावना आपण माणसांच्या बाबतीत ठेवली तर कधीच नाती तूटणार नाही...

जीवनाच्या प्रवासात आपण नेहमी हे म्हणतो, जेव्हा माझ्याकडे ही गोष्ट असेल तेव्हा मी आनंदी होईल, जर आपण जेव्हा आणि तेव्हा हे दोन शब्दचं काडून टाकलं तर समजून जातं कि आनंदी राहायला आपलेलं कोणत्या गोष्टी ची गरज पण नाही.

जीवन जगावे असे कि, आपल्या मागे लोकांनी हि नावजावे
जगत असताना जगाचे काय करावे, ते तर नावच ठेवायला असावे...
स्वतः ला सावरत जगाला हि सांभाळावे
जीवनाचा आनंद स्वतः, स्वतः तच शोधावे...

.    .    .

Discus