Image by Mehrshad Rezaei from Pixabay

आज माझ्या त्या बालपणीच्या
आठवणीत पुन्हा असताना मग्न।
मागून लगेच एक आवाज कानी
पडला खुप छान झालं हो तुझं लग्न।।१।।

हे शब्द ऐकताच मी
लगेच भानावर आले।
सगळ्यांसमोर वाकून
त्यांचे आशीर्वाद घेतले।।२।।

मध्ये मध्ये त्यांच्यावर
चोर कटाक्ष टाकत होते।
आज लाल रंगाच्या शेरवानीत
ते खूपच छान जे दिसत होते।।३।।

त्यांनी माझ्याकडे बघताच
मी लगेच मान खाली केली।
कारण त्यांच्या नुसत्या
नजरेने माझ्या गालावर
लाली जी होती पसरली।।४।।

बघता बघता आता
ती वेळ देखील आली होती।
माझी माझ्याच घरातून
पाठवणी झाली होती।।५।।

नवीन घर,नवीन माणसं
आज माझं पूर्ण जगच बदललं।
जुन्या आठवणींचं ते पान
जणू आत्ता मी मिटलं।।६।।

आज नवीन सुरुवात
होणार होती माझ्या संसाराची।
अचानक मन बावरल
जेव्हा चाहूल लागली
त्यांच्या येण्याची।।७।।

हात धरून माझा
आश्वस्थ केलं त्यांनी मला।
पुढचे सातही जन्म
तूच हवी पत्नी म्हणून मला।।८।।

खूप सुंदर चालू झाला
होता संसार माझा।
खूपच जीव होता
माझ्यावर त्यांचा।।९।।

अचानक दुपारी एक
कॉल आला त्यांना।
म्हणाले तडक बोलावणं धाडलं
आहे सगळ्या जवानांना।।१०।।

निरोप घेऊन माझा
ते घाईतच निघून गेले।
पुन्हा लवकर येईल
हे बोलायचं मात्र
विसरून गेले।।११।।

वाट पाहताना त्यांची
आज कित्येक्त महिने गेले।
जाताना त्यांना गोड बातमी
द्यायचे तेवढे राहून गेले।।१२।।

अचानक सकाळी दरवाजा
कोणीतरी ठोठावला।
हळुवार पाऊले टाकत
उठले कारण नववा महिना जो
लागला होता मला।।१३।।

एक जवान उभा
होता दारात।
त्याला बघताच क्षणी
धडकी भरली मनात।।१४।।

ऐकायचे नव्हते जे मला
तेच त्याने सांगितले होते।
आज जन्माधीच माझे
बाळ पोरके झाले होते।।१५।।

खुप धीर एकवटून
मृतदेह त्यांचा गेले
होते बघायला।
नकळत अश्रू ओघळे
गालावर बघून त्यांना
तिरंग्यात लपेटलेला।।१६।।

शेवटच्या क्षणी सुद्धा
गोड हसू पसरलं होत
त्यांच्या चेहऱ्यावर।
शेवटचा श्वास सुद्धा
बलिदान केला होता
त्यांनी या भारत भूमीवर।।१७।।

मनोमन वचन देऊन
आज मुखाग्नी दिली
होती मी माझ्या सौभाग्याला।
या भारत भूमीसाठी तयार
करणार होतो मी
आता माझ्या बाळाला।।१८।।

.    .    .

Discus