Photo by Tim Wildsmith on Unsplash

रोजची गडबड आजही
चालू होती।
कॉलेजला वेळेवर पोहोचायची
घाई जी झाली होती।।

उठले,सगळं आवरून घाईतच
निघायला तयार झाले।
नेहमीप्रमाणे आजही आईने
काळजी घेण्यासाठी चेतावले।।

सगळ्यांचा निरोप घेऊन 
केली प्रवासाला सुरुवात।
पण तेव्हा कुठे माहिती होते
आज काळ करणार होता माझा घात।।

रिक्षा करून पोहोचले
नेहमीच्या स्टेशन वर।
वाट पाहत ट्रेनची
नजर भिरभिरत होती 
हातातल्या घडाळ्यावर।।

बरोबर सातच्या घटक्याला
दिसली ट्रेन येताना।
तसा सुटकेचा श्वास सोडला
आज उशीर जो होणार नव्हता मला।।

न प्लॅटफॉर्म वर पोहोचताच
तो आंनद माझा क्षणिकच् ठरला होता।
ट्रेन मधली गर्दी बघून जणू
मिस्टर इंडियाच झाला होता।।

तरीही ठरवले प्रयत्न काही 
मी सोडणार नाही।
आज काहीही झालं तरी
उशिरा मी पोहोचणार नाही।।

आजूबाजूची लोक माझ्या
भराभरा ट्रेन मध्ये चढत होती।
खरतर एकमेकांना शत्रू- 
असल्यासारखे भिडत होती। 

सगळ्यात शेवटी प्रयत्नांनी
मीही चढले ट्रेनमध्ये ।
पण एक पाय होता आत
तर एक लटकत होता हवेमध्ये।।

ट्रेन ने वेग धरला तसा 
धस्स झालं मनात।
खांब्याला घट्ट धरलं
नाहीतर मृत्यूचं दर्शन
झालं असत क्षणात।।

ज्याची भीती होती
शेवटी तेच झाले 
सटकला माझा हात।
तोल जाऊन डोकं आदळले
तिथल्या दगडात ।।

रक्त वाहायला लागले
होते डोक्यातून।
थोड्यावेळाने माझी
शुद्ध हि गेली होती हरपुन।।

इतके रक्त वाहिले होते डोक्यातून।
की त्राणच निघून गेला होता शरीरातून।।
हळूहळू श्वास हि साथ सोडत होते माझे
प्राण जो निघून जात होता माझ्या देहातून।।

आठवत होता प्रत्येकजण 
या शेवटच्या क्षणी।
माझ्या बंद डोळ्यातूनच
वाहत होते पाणी।।

तीतरी वेळ तसेच 
शांत पडले होते।
आता या जगात
माझे शेवटचे काहीच
क्षण उरले होते।।

उजेडाला दुभागत आकाशात
कातरवेळ आली होती दाटून।
आज मी शेवटचा प्रवास
संपवला होता माझा
आईचा तो हसरा चेहरा आठवून।।

.    .    .

Discus