Photo by Kimson Doan on Unsplash

असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
घडाव्या तिथे नेहमी वेड्या थट्टा.
असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
बसता तिथे न राही वेळेचा पत्ता.
असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
नेहमी मिळावा तिथे हसण्याचा भत्ता.
असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
आठवणींचा असावा मोठा गठ्ठा.
असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
अबोला ही असावा तिथे चट्टा.
असावा सुंदर मैत्रीचा कट्टा,
नसे तिथे कधी विश्वासाचा सट्टा.

.    .    .

Discus