https://wallpapercave.com/w/wp13673470

मानायला तुमची कीर्ती राजे, स्टेटस वर फक्त दिसतायेत भारी,

पण मानून घेण्यास तुमची कीर्ती राजे, नाही कोणाच्या मनाची तयारी.

उमजायला तुमचा प्रपंच राजे, पोवाडे नाही ऐकवले जात आता भारी,
पण प्रपंच तुमचा राजे, समजावणारी ४ विचित्र वाक्य कानी पडतात काहीतरी.

समजायला तुमचा इतिहास राजे, आता रीलस सगळे बघतायेत भारी,
पण समजून घेण्यास तुमचा इतिहास राजे, पुस्तके का वाचतील मग कोणीतरी.

मिरवायला तुमचा भगवा राजे, गर्दी भरपूर जमली भारी,
पण पेलवेल तुमचा भवगा राजे, असे प्रतापी नाही उरले आतातरी.

दाखवायला तुमचा अवतार राजे, दाढी चंद्रकोर लावणारे दिसतायेत भारी,
पण दिसावे तुमचे आचरण राजे, हल्ली नाही कोणी ते तिकवणारा तरी.

बघायला तुमचे दुर्ग आणि किल्ले राजे, Trekkers सारे भरलेत भारी,
पण तिकवण्यास तो वारसा राजे, जणांची इच्छा आहे अपुरी.

तरी राजे परत यावे, हे वाक्य गुंजतात भारी,
का येतील राजे परत, बघायला ही नौटंकी सारी.

.    .    .

Discus