Photo by charlesdeluvio on Unsplash
प्रत्येक माणसालाच अगदी लाहांमुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो, म्हणजेच रोजच्या जीवनातील कामा व्यतिरिक्त काहीतरी मनापासून करण्याची इच्छा, आवड की जे केल्यामुळे अगदी आनंद मिळतो, मन प्रसन्न होते आणि क्वचित कोणाचे आयुष्यही बदलून जाते. छंद हा कुठल्याही प्रकारचा असू शकतो आणि तो कोणीही जोपासू शकतो. अगदी पूर्वजांपासून अनेक जणांना वेगवेगळे छंद असायचे. पूर्वीच्या काळी लोक काड्यापेट्या गोळा करायचे, वेगवेगळ्या गाड्या, क्रिस्टल, अगदी पोस्टाची तिकिटे सुद्धा. पण आता काळ बदलत चालला आहे, पत्रे, तिकिटे ह्यांचं अस्तित्वच जणू संपू लागलं आहे कारण आता पत्राची जागा घेतली आहे मोबाईल आणि इंटरनेट नी. पत्र लिहून झाल्यावर त्यावर तिकीट लावून ते पोस्टाच्या पेटीत टाकल्यावर पोस्तमांकाका ते पत्र उचित पत्यावर नेऊन द्यायचे आणि मग लांब राहणाऱ्या लोकांना एकमेकांशी संवाद साधता यायचा , त्या पत्राची वाट बघण्यात आणि मग त्यातील तपशील वाचण्यात एक वेगळीच उत्कंठा असायची. पण हे सगळं आता मुलांना शाळेत प्रोजेक्ट म्हणून कधीतरी करायला सांगतात. त्यामुळे त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. खर सांगायचं तर त्यात मुलांची काही चूक आहे असं नाही कारण काळ बदलला आहे तस तंत्रज्ञान ही विकसित झालंय. पूर्वी फक्त बोलण्यासाठी वापरात येणारा फोन आता काही क्षणात पत्राच काम करू लागलाय. त्यात काही चुकीचे आहे असे नाही त्यामुळे अनेक काम विनासायास वेळेवर घरबसल्या होतात.
खर सांगायचं तर विकसीत तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मोठी माणसे, अगदी लहान मुले सुद्धा त्या एवढ्याशा मोबाईल च्या कळत नकळत आहारी जायला लागलेत. पूर्वी जोपासलेले अनेक छंद लुप्त व्हायला लागलेत जस की अनेकांना लिखाणाचा, वाचनाचा, कवितांचा किंवा विविध खेळ खेळण्याचा छंद होता अजून काही मोठी माणसे , म्हातारी माणसे ह्या सगळ्यात आनंद घेतात, पण हल्लीची तरुण पिढी मात्र ह्या सगळ्या पासून वंचित राहते आहे, ह्या सगळ्या छंदांची जागा मोबाईल गेम ह्या एकाच छंदानी घेतल्यासारखे वाटू लागले आहे. लहान मुले ज्यांच मैदानी खेळ खेळायचे वय आहे पण त्यांना त्या पासून परवृत्त करू पाहणाऱ्या मोबाईल गेम नावाच्या राक्षसाला मात्र त्यात आनंद मिळतो आहे.
खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे ह्या मुलांना मोबाईल ची ओळख कोणी करून दिली? अगदी दोन तीन वर्षाची मुले सुद्धा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघण्यात व्यस्त असतात, ती रडू नयेत, आपल्याला बाहेर त्रास देऊ नयेत किबहूना त्यांच्या बरोबर खेळायला लागू नये म्हणून आई, वडील, किंवा घरातील इतर मंडळीच त्या एवढ्याशा हातात ह्या मोबाईल नावाच्या राक्षसाला देतात आणि मग तो त्यांचा पिच्छा पुरवितो. मुलांना आपसूकच त्याच आकर्षण वाटू लागतं किंबहुना मोबाईल हेच त्यांचं जग झालेलं असतं, हे आवडलं नाही तर दुसरं नाहीतर तिसरं बघण्यात ती स्वतः त्यात हरवून जातात आणि तो एखाद्या हैवाना प्रमाणे त्यांचं नुकसान करतो. आपण काय करतोय, किती वेळ पैसा घालवतोय ह्याच भान राहत नाही , गेम हा गेम म्हणून थोडावेळ न खेळता दिवसभर व्यसन असल्यासारखं त्याच्या मागे लागतो. लहान मुलांना कळत नाही पण घरातील मोठी माणसे, कॉलेज मध्ये जाणारी तरुण मुले ही सुधा दिवसभर मोबाईल वर बसतात आणि माझ्या एवढ्या लेव्हल झाल्या म्हणून फुशारक्या मारतात . अनेक जण स्वतः च शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतात.
दिवसातला काही वेळ हा करमणुकीसाठी वापरणं इथपर्यंत ठीक आहे पण तासन तास मोबाईल वर बसून चॅटिंग करण हे कितपत योग्य आहे? त्यामुळे माणसांमधील संवाद संपू लागला आहे.
अशाच एका संवाद, नाती संपू लागलेल्या कुटुंबाची एक गोष्ट आहे. एक कुटुंब असतं त्यांचं कोकणात एक सुंदर कौलारू घर असतं पण तिथे राहायला कोणीच नसत . आजी, आजोबा काही काळ शहरात राहत असतात, आणि त्यांची मुले आणि नातवंडे परदेशात. परदेशात राहत असल्यामुळे त्यांना प्रगतशील टेक्नॉलॉजी बद्दल जरा अधिकच ज्ञान असते. शाळेत सुद्धा बहुतेक Tab आणि Laptop वर त्यांचं शिक्षण चालू असतं. पाटी, फळा, खडू, पेन्सिल हे त्यांना पाहून सोडा ऐकूनही माहीत नसते. आता हा त्यांचा दोष नव्हे तर त्यांना काळानुरूप मिळालेल्या सुखसोई किंवा प्रगतशिलतेचे लक्षण अस म्हणता येईल.
आजी आजोबांना कायम वाटायचं आपल्या मुलांनी एकडे परत यावं , नातवंडांबरोबर त्यांना खेळायला मिळावं, एकत्र कुटुंब म्हणजे काय, इथली संस्कृती ह्याची त्यांना ओळख व्हावी. इथे आले तर कदाचित त्यांना इथल्या गोष्टी मध्ये रस वाटेल , आकर्षण वाटेल अशी एक भाबडी आशा होती. ते मुलाला कायम येण्याचा आग्रह करत, तो कायम येणार नाही हे माहीत असूनही थोडे दिवस ये अस सांगत. त्यांच्या मुलालाही घरी जाण्याची आणि आई वडिलांना भेटायची ओढ होतीच म्हणून त्याने ऑफिस मधून एक महिन्याची सुट्टी घेतली आणि मुलांना घेऊन भारतात आपल्या घरी आला. सगळ्यांनाच खूप आनंद झाला, आजी आजोबा खूप लाड करत होते, मनसोक्त आराम चालू होता, पाहिजे ते खायला मिळत होते पण मोबाईल आणि टॅब काही हातातून सुटत नव्हता. जरा कंटाळा आला की मोबाईल वर गेम खेळत बसत, बाहेर जाऊन आजूबाजूच्या लोकांची ओळख करून घेणं, नातेवाईक बरोबर गप्पा मारणं तर दूर पण बाहेर जायला ही तयार नसायची. ही गोष्ट आजोबांच्या लक्षात आली. मग ते म्हणाले चला उद्या आपण कोकणातल्या आपल्या घरी जाऊ, तुमचं पिकनिक पण होईल आणि सगळ्यांनाच बदल होईल. तास पूर्वी कधीतरी गावाकडे गेली होती पण तेव्हा फारच लहान होती त्यामुळे फारस आठवत नव्हते. Beach आहे तिकडे हे माहीत होते पण त्याच फारस अप्रूप नव्हते. गावाकडे गेल्यावर ते कौलारू घर बघितलं. तिथली माणसे त्यांची आपुलकीने चौकशी करत होती. घराभोवती मोठी आमराई होती, नारळी पोफळीच्या बागा होत्या. एक मोठी विहीर होती त्यातून पाणी काढायला लागायचं हे सगळं नवीन होत. बहुतेक त्यांच्या मनात विचारही आला असेल कुठे आणलय आम्हाला, इथे कास राहायचं? इथे आल्यावरही तेच दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी झाल्यावर मोबाईल वर गेम खेळत बसली आणि आजोबांना काही ते पहावल नाही कधी बघावं तेव्हा मोबाईल. त्यामुळे आजूबाजूला बघण्याची इच्छा च कुठेतरी नष्ट होते आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा आनंद ही मुलं गमवत आहेत असं त्यांना वाटू लागलं, मग त्यांनी एक युक्ती केली, ते म्हणाले चला आपण नदी काठी फिरायला जाऊ पण माझी एक अट आहे तुम्ही मोबाईल ना घेता यायच माझ्याबरोबर. मुलेही जायला तयार झाली, मग नदीवर जाताजाता त्यांनी मुलांना कोकणातील माणसे, त्यांचं राहणीमान, ते काय काय करतात, किती कष्ट करतात ह्या बद्दल माहिती सांगितली, मुलेही मन लावून ऐकत होती. जाताना रस्त्या लगत दिसणारी अनेक झाडे, फुले, आंब्याचा मोहोर, लगडलेल्या कैऱ्या बघत जात होती, मग लहानपणी तुमचे बाबा आणि मी कसे दगड मारून कैऱ्या पडायचो आणि तिखट मीठ लावून खायचो ह्या बद्दल सांगितल. तसेच आवळे, चीनचा आणि इतर फळांचं. नारळाच्या झाडावर कास चढायचो आणि मग त्यातील मधुर पाणी आणि लुसलुशीत खोबरं खायचो असे अनेक विषय.
त्यावेळी आमच्याकडे तुमच्या सारखा मोबाईल, टॅब, एवढच नाही तर TV सुद्धा नव्हता, पण काम करण्यात, मैदानी खेळ खेळण्यात, घरच्यांची मदत आणि अभ्यास करण्यात सगळा वेळ जायचा. एवढं सगळं करून जर कधी निवांत वेळ मिळाला तर झोपाळ्यावर बसून अनेक पुस्तके वाचायचो, तुम्ही यातले काय काय करता? तुम्हाला कधी पुस्तके वाचाविशी नाही वाटत? असे अनेक प्रश्नही नकळत विचारत होते. अशी चर्चा करताना कधी नदीवर पोचले त्यांना कळलंच नाही. नदीवर गेल्यावर नेहमी प्रमाणे उन्हाळा असल्यामुळे गावातील मुले पोहण्याचा आनंद घेत होती, काही जण निवांत मासे पकडत होती, काही नुसतीच धपाधप उड्या मारत होती. मुलांनी अस कधी पाहिलच नव्हत कारण त्यांना फक्त स्विमिंग पुल किंवा बिच वर पाण्यात डुंबण एवढच माहीत होते. इथे ह्या मुलांकडे कुठलाही कॉस्च्युम, गॉगल नव्हते आणि कोणी शिकवायला ही नव्हते की फ्लोट्स नव्हते, ज्यांना येत नव्हते ते साधं टायर घेऊन शिकत होते, हे पाहून स्वाभाविकच त्यांना आश््चर्य वाटले. मग त्यांनाही पाण्यात जावस वाटलं आणि आजोबांना विचारून ते ही पाण्यात गेले आणि मनसोक्त खेळले आणि मग घरी गेले. थोड्यावेळाने त्यांना भेटलेले नवीन मित्र बोलवायला आले त्यावेळेला मात्र त्यांना मोबाईल छा विसर पडला आणि मोबाईल पटकन खाली ठेऊन ते बाहेर गेले. आजोबांनी केलेल्या युक्तीचा उपयोग झाला. नंतर चक्का जेवायला बोलवे पर्यंत मुले बाहेर गोटया , वीट्टी दांडू, लगोरी खेळण्यात रममाण झाली अनेक नवीन खेळ खेळायला शिकली. सुट्टीचे ते कोकणातले घालवलेले दिवस त्यांना मोबाईल च विसर पडला. पण आजोबांना शंका होती की इथून गेल्यावर परत हे मोबाईल घेऊन बसतील का? पण तस नाही झाल मुलांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी कामा पुरताच मोबाईल वापरायला सुरुवात केली, उरलेला वेळ बाहेर जाऊन आवडीचे छंद जोपासण्यात घालवला आणि मोबाईल नावाच्या राक्षसाचा पराभव झाला आणि मोबाईल च व्यसन संपुष्टात आलं.