Image by Adina Voicu from Pixabay

लाटासंगे उधळीत सारे शंख शिंपले पसरत आले
कीनाऱ्यावर बिखरून सारे गालीचा सुंदर बनवून गेले

एक शंख एक शिंपला किनाऱ्या वर हितगूज केले
सभोवतालच्या वाळूमध्ये सर्वांसमवेत विरून गेले

कधी खाली कधी वरती लपंडाव जणू खेळत होते
आपल्याच आप्तेष्टांभोवती रमून सारे गेले होते

रंगीबेरंगी लाघवी शिंपले लक्ष साऱ्यांचे वेधीत होते
प्रत्येकाच्या ओंजळीत अलगद जाऊन बसले होते

सोडून आपुल्या घराला, मग मनी ते दुःखी झाले
हताश होऊनी सारे, मग आसवात न्हाऊ लागले
एकमेकांचे सांत्वन करून , पुन्हा नव्याने जगू लागले

.    .    .

Discus