Photo by Febrian Adi on Unsplash

कधी उन पावसाचा खेळ
कधी थंडगार वारा
मन हेलावून टाकतो
हा आसमंत सारा

जाई, जुई चा हा गंध
जणू कस्तुरीचा ठेवा
चाफ्या संगे फैलावतो
अत्तराचा सडा

प्राजक्ताचा सडा जणू
निखळलेल्या चांदण्या
हिरवळीवर भासतात
दवबिंदू सारख्या

कधी असते इंद्रधनुष्य तर कधी संधिप्रकाश
रंगांची बरसात होते आकाशात

हिरवाईने नटते डोंगरांची रांग
मखमलीच्या पायघड्या
त्यावर फुलपाखरांची रांग

अशा ह्या श्रावणात होतात पूजा, पाठ
स्तोत्र पाठ ऐकत होते दिवसाची सुरुवात

पाखरांची किलबिल जणू
मंजुळ गान
मोहून टाकतात स्वर
ह्या श्रावणात

.    .    .

Discus