Image by Jill Wellington from Pixabay
पायांना ते बोचतील काटे,
त्याची मला भीती नाही.
चालताना मधे थांबणे,
माझी काही निती नाही..
शांतता मिळवण्यासाठी,
माझा कोणता डाव नाही.
वाटेवर या जगताना,
मनाला कशाची हाव नाही..
मिळाले जरी कमी आयुष्य,
तरी मज फिकीर नाही.
समाधानाने श्वास मिळतो,
म्हणून कशाची किरकिर नाही..
वाट्याला जी सुख, दुःखे आली,
ती पाठलाग सोडणार नाहीत.
आठवणींचे अगतिक क्षण,
मनातून काही जाणार नाहीत..
भुरळ घालेल कोणी मझला,
अशी मनाची स्थिती नाही..
मान डोलावत सारंच ऐकेन,
अशी माझी मती नाही...