Photo by Christian Senan on Unsplash

एका झोपडीत एक कुटुंब राहत होते. कष्टाळू आणि प्रामाणिक होते. त्यांना निता नावाची एक मुलगी होती. निता आकर्षक बांध्याची होती, दिसायला तशी जेम तेम होती. गरीब परिस्थिमुळे तिला शिक्षण घेता येत नव्हते. आई धुनभांडी करून घर संसार चालवत असे. वडिलांना दारूचे व्यसन होते. निताला नेहमी वाटतं असे आपण ही शाळेत जावे. म्हणून एकदा तिने आपल्या आईकडे हट्ट धरला आई मला शाळेत जायचे आहे.

आपल्या मुलीला शाळेत जायचे आहे म्हणून आईला वाटलं लेकरू म्हणतय तर शाळेत घालूया म्हणून आईने निताच्या हाताला धरून शाळेत घेऊन गेली. तस तिला अंगणवाडीतल शिक्षण मिळालंच नव्हतं पण आता निता पहिलीत गेली. इतर मुलाकडे पाहून निताला खूप छान वाटतं असे. निताच्या मनात आले शाळा किती चांगली आहे असं वाटतं मला शाळेत बसावे. निता अभ्यासात हुशार होती.

मास्तरीण बाई वर्गात आल्या गाणे शिकवू लागल्या. निताला गाण्याची खूपच आवड लागली. दिवसभर निता गाणे गुणगुणत होती. घरी गेल्यावर आईला ही निता गाणे ऐकवू लागली. आई निताच्या प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करत होती. दुसऱ्या दिवशी मास्तरीणबाई वर्गात आल्या आणि पहातात तर काय निता आपल्या गोड आवाजात काल शिकवलेले गाणे गुणगुणत आहे. मास्तरीण बाईनी निताचा गोड आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाल्या. काल तर गाणे शिकवले होते आणि निता आज गाणे म्हणत आहे हे पाहून मास्तरीणबाईला आश्चर्य वाटले. मास्तरीणबाईनी दुसऱ्या दिवशी निताच्या आईला शाळेत बोलावले तुमची मुलगी खूप हुशार आहे आणि तिचा आवाज खूप गोड आहे. हे पहा जिल्हा स्तरीय गायन स्पर्धा आहेत तर तिला तुम्ही पाठवा तिचा सगळा खर्च आम्ही करतो असे निताच्या आईला मास्तरीणबाई म्हणाल्या. निताची आईच सगळे पहात असे वडिल व्यसनी असल्यामुळे निताच्या आईला पण वाईट वाटे.

गायन स्पर्धेसाठी निताकडून खूप तयारी करून घेतली. कोल्हापूरला जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी खूप लांबून लांबून मुले आली होती. गायन स्पर्धा पार पडली पण निताचे गाणे सगळ्यांच्या जणू तोंडामध्ये गुणगुणु लागले. प्रथम क्रमांकाला 5000 रु. बक्षीस ठेवण्यात आले होते. परीक्षक निकाल देण्यासाठी मंचावर आले. निताचे नाव पुकारताच निताला खूप आनंद झाला. तिने घट्ट मास्तरीणबाईला मिठी मारली. एवढं मोठे पैसे कधीच पाहिले नव्हते.

निता जेव्हा घरी पोहचली आणि आईच्या पाया पडत आई माझा पहिला नंबर आला आहे गायन स्पर्धेत हे सांगताच आईला खूप आनंद झाला. निता आईला म्हणली आई आपण आता मोबाईल घेऊ तुझ्यासाठी खास. तुला खूप ठिकाणी कामाला जावे लागते.तुझ्या मोबाईल नसल्यामुळे आजारी असली तर तुला सांगता येत नाही, होय ग बाळा नक्की घेऊ. पण तुला सांगते मास्तरीणबाईचे पैसे देऊन राहिलेल्या पैशाचा मोबाईल घेऊ निताला पण पटले.

निताच्या आईला निताचे खूप कौतुक वाटे. दुसऱ्या दिवशी निताला घेऊन शाळेत गेली मास्तरीण बाईला ही धन्यवाद दिला तुमच्यामुळे निता इथपर्यंत पोहचली. निताच्या आईने पैसे मास्तरीणबाईच्या हातात ठेवले पण मास्तरीणबाई घ्याला नकार दिला पण निताची काही केल्या ऐकेना शेवटी पैसे देऊ केले.मास्तरीणबाईच्या डोळ्यात पाणी आले.निताची इच्छा पूर्ण करण्यासाठी राहिलेल्या पैशाचा मोबाईल आणला निताला खूप आनंद झाला.

गावात स्वछता राबविण्यासाठी काही पाहुणे शहरातून आले होते. स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगा असे मुलांना म्हणाले. निता खूपच लहान होती सर मी सांगू का? सर म्हणाले तू सांगणार तू खूप लहान आहेस पण निताचा चेहरा बारका झालेला पाहून बरं सांग निता. निता आपले भाषण सुंदर आवाजात सांगू लागली.सगळेजण भाषण ऐकून टाळ्याचा कडकडाट करू लागले. आलेल्या पाहुण्यांनी निताला 500 रु. मिळाले. निता उड्या मारत मारत घरी आली आणि आईला म्हणाली आज मी भाषण केलेले पाहुण्यांना खूप आवडलं म्हणून त्यांनी 500 रु. दिले. आईला मिठी मारून सांगू लागली. आईला ही खूप खूप आनंद झाला. आपले बाबा खूप दारू पितात म्हणून खूप वाईट वाटते.पण आई आता आपण बाबासाठी 500 रुपयाची कपडे आणू असे आईला सांगू लागली. आई तुला एवढी बुद्धी कुठून येते ग बाळा. निता आईला घेऊन बाजारात गेली बाबासाठी कपडे घेऊन आले.

बाबांना सकाळी कपडे दाखवू कारण बाबा आता नशेत असतात. मग बाबांना सकाळी कपडे दाखविले. बापाला आपल्या लेकीचं खूप कौतुक वाटले. पण दारूचे व्यसन सूटत नसे. निता शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि भाग घेत असे बक्षीस मिळवत असे. निता आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. मास्तरीण बाई निताच्या आईला बोलल्या निताला टीव्ही शो मध्ये बोलावले आहे. निताच्या आईचा चेहरा थोडासा बारीक पाहून तुम्ही खर्चाचा विचार करू नका असे म्हणल्यावर आईला समाधान वाटले.

मुबंईसारख्या शहरात हा कार्यक्रम होता. मुबंईत निता आणि इतर बरे जण गाणे गाण्यासाठी आले होते. निताला थोडी भीती वाटतं होती. पण निताने स्वतःला धीर दिला आणि गाणे गाण्यासाठी स्टेजवरती गेली. तिचा गोड आवाज ऐकून परीक्षकही तोंड भरून स्तुती करू लागले. यामध्ये निताला खूप अवॉर्ड देऊन सत्कार केला. निताला चित्रपटात गाणे गाण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. निताची मास्तरीण बाईचे खूप उपकार मानत असत आणि कधीच त्यांचे पैसे ठेऊन घेत नसतं. निता खूपच मोठी भाग्यलक्ष्मी बनली होती. अभ्यासात कधीच निता मागे राहत नसे. निताने खूप कमी वयात घर घेतले. शेजारी पाजारी निताचे खूप कौतुक करत असत. निता आता खूप श्रीमंत बनली होती आणि आईला पण काम सोडून द्याला सांगितले. निता महाविद्यलयीन शिक्षण घेत घेत आता mpsc परीक्षेची तयारी केली.पहिल्याच प्रयत्नात निताला यश मिळाले. निता खूप मोठी PSI अधिकारी बनली. निता कधीच मास्तरीणबाईला विसरत नसे त्यांना नेहमी गुरु मानत असे. सगळ्या लोकांना एवढया छोटया झोपडीतली मुलगी आज तिच्या आयुष्यात किती प्रगती झाली करावं तेवढं तिच कौतुक कमीच आहे असे सगळ्यांना वाटे. 

निताने बाबांना व्यसन मुक्ती केंद्रात दाखल केले आणि बाबानी व्यसनपासून मुक्ती मिळवली. आता निताच्या परिवरात खूप खूप आनंदी आनंद झाला. निता, आई, बाबा, मास्टरीणबाई सगळ्यांचा खूप आदर करत असत. निताची ओळख आता सगळीकडेच पसरली होती. निताने आपली स्वतःची ओळख निर्माण केली होती.

.    .    .

Discus