Image by mohamed Hassan from Pixabay 

मी हे शिर्षक का दिले असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ?? काही आठवतंय का तुम्हाला ?? नाही बर बर मी सांगते. हा आहे पत्राचा मायना सप्रेम नमस्कार विनंती विशेष . काळाच्या ओघात हे सगळे मागे पडले. आता ऑनलाईनचा जमाना आहे . अंरॉईडवल्याना तर हे काहीच माहिती नसेल . पोस्ट ऑफिस , पोस्ट कार्ड, आंतरदेशीय, मनी ऑर्डर ई. सगळ्याच गोष्टी मागे पडल्या. आ मच्या लहानपणी पोस्टमनची सगळेजण वाट बघायचे . करण लांबचे नातेवाईक खुशाली , एखाद्याचे लग्न ठरल्याची बातमी, किंवा एखादी वाईट बातमी पत्राद्वारे कळवत असत. रक्षाबंधन, भाऊबीज किंवा शिक्षणासाठी लांब राहिलेल्या आपल्या पाल्याला पैसे मनिऑरडरनी पाठवले जायचे. कोणाचे पत्र आले की ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद व्हायचा. दूर दूर गावावरून आलेल्या त्या पत्रात प्रेमाचा ओलावा असे , आपुलकीचे नाते असे. एकाच पत्रात सगळी बातमी तसेच लहानांना आशीर्वाद , मोठ्याना नमस्कार लिहिलेला असे. आता रोज आपण मेसेज करतो, फोन करतो पण त्यात सगळाच कोरडेपणा जाणवतो. प्रेमाचा, आपुलकीचा ओलावा नसतो. 

ऑनलाईन पेमेंट करतो आपण पण जे वाट बघणे असायचे , जी उत्सुकता असायची त्याची कमतरता दिसून येते. पत्र वाचण्यात जशी उत्सुकता होती तशी लिहिण्यात पण असायची. कारण मनापासून आपल्या मानसानसाठी लिहिलेली असायची . आतासारखे फॉरवरडेड मेसेज नसायचे. आता तुम्ही म्हणाल काळा नुसार बदलायला पाहिजे आपण , मान्य अगदीच मान्य आहे पण जुन्यालापान तेव्हढेच जपले पाहुजे आपण. असो हे सगळे काळानुसार मागे पडले असले तरीही आजही एखादा पोस्टमन दिसला की उगाचच मनाला हुरहुर लागते. मन वाट बघते आपल्या माणसांच्या पत्राची . हमम गेले ते दिवस . आता प्रत्येकाच्या हातात एनरोईड फोन आलाय. नवीन पिढीबरोबर जुनी पिढीपन त्यातील अप्सची माहिती करून स्वतःला अपडेट करत आहे. आता रिझर्वशन्स , ऑनलाईन पेमेंट्स , शो तिकीट , हॉटेलची ऑर्डर , शॉपिंगसुदधा ऑनलाईन करू शकतो. घर बसक्या सगळे आपण एका फोनवर करू शकतो. त्यामुळे आता पत्र , त्यातला स. न. वि. वि. काळानुसार मागे पडले हे मात्र नक्की. असो आता मीपण माझा फोन घेऊन वॉट्सउप बघते .
बाय बाय.

.    .    .

Discus