आई म्हणाली, पंख कितीही स्वतःला फुटू द्याचे
पण संस्कृति आणि संस्कार नाही कधी विसरायचे.
शाळेत जाण्यापूर्वीच शिकवली वर्णमाला, पाढे आणि संख्या
काय चूक काय बरोबर याची सांगितली आईने आम्हाला व्याख्या.
एकदा आईने दिली म्हातारीला अन्नासाठी भीक
आईने नाही बघितली तिची चूक, बघितली फक्त तिची भुक.
प्रत्येक गोष्टीत माणसाने रहावे समाधानी
मग आरोग्य, मनाने, पैशाने नेहमी असतो माणूस धनी.
असावे चांगले आचार आणि आहार
मग नेहमी येतात आपल्याला चांगले विचार.
आपण माणूस आहे, काहीतरी चुका करणार
महत्वाच आहे की त्याच्यापासून आपण काहीतरी शिकणार.
आंबट, गोड, तिखट, मीठ आणते जीवनात आणि जेवणात गोडी
आई नेहमीच म्हणते अन्नाची कधीच करू नये नासाडी.
बाबा म्हणाले, कधी कधी मनात होते कितीदा भावनांची भेळ
माणुसकी आणि प्रामाणिकपणा सोडण्याची नाही येवो कोणतीही वेळ.
सख्खा असो की चुलत, नातं असावा घट्ट
गरीब असो की श्रीमंत, मैत्री ठेवावी नेहमी घनिष्ट.
स्वाभिमान, आत्मनिर्भर हे असावे गुण
जीवनात नेहमीच यश मिळते मग भरभरून.
निरोगी राहण्यासाठी पाळावे थोडे नियम
राग आवरण्यासाठी नेहमीच ठेवावे स्वतःवर थोडा संयम.
प्रत्येक काम करताना नाही बघायचा स्वार्थ
कांम करत रहावे, भविष्यात माहीत पडते त्याचा अर्थ.
महत्वाचे निर्णयासाठी मोठ्यांची घेत रहावे परवानगी
चांगल्या गोष्टीसाठी नेहमी देत रहावे देणगी.
बाबांनी समजावले पैशाची करत रहावे नेहमी गुंतवणूक
विचार करून निर्णय घ्यावे, नाहीतर होऊ सकते फसवणूक.