Photo by Josue Michel on Unsplash

काम करते मी खूप घरांचे
मी आहे मोलकरीण बाई
माझ्यासाठी मालकीण आहे
काकू, मावशी, मॅडम किंवा ताई।

धुनी-भांडी, झाड़ू-पोछा, स्वयंपाक मी करते
स्वच्छ कामाची सगळ्यांना अपेक्षा असते
कधी चुकले की मालकीण बाई रागवते
तरीपण मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

इतक्या घराचे काम करून कधी कधी मी थकते
तरीपण संगळ्याशी हसत खेळत बोलते
मालकीण बाईच्या हातचा चहा पिऊन थकवा निघून जाते
त्यावेळी मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

आजारी मी पडले की मालकीणबाई विचारपूस करतात
त्यांना जरी हातानी काम करावे लागते
तरी ही औषधे देवून माझी काळजी घेतात
त्यावेळी मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

मी माझ्या सुख दुःखाच्या गोष्टी बोलते
त्यांचे ही विचार मी ऐकून घेते
कितीतरी गोष्टी नवीन शिकायला भेटते
त्यावेळी मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

दुसऱ्यांची ऊष्टी, धुणे मी स्वखुशीने करते
कामाचे कौतुक म्हणून दिवाळीला बक्षीस भेटते
मानाने कधी कधी गोड ही खायला मिळते
त्यावेळी मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

सुटी अचानक घेतली की बोलणे ऐकून घ्यावे लागते
नाते सुरळीत करण्यासाठी मी पण जास्तीचे काम करून देते
दोन दिवसांत परत सर्वकाही पूर्वीसारखे होते
त्यावेळी मला आमच्यात आपुलकीचे नाते वाटते।

गरज आमच्या दोघांची ही असते
माझं घर त्याच्या दिलेल्या पगारानी चालते
त्यांच घर माझ्या कामामुळे स्वच्छ राहते
म्हणून आमच्यात आपुलकीचे नाते निर्माण होते।

.    .    .

Discus