Image by Moondance from Pixabay

दररोज किती घेत असते कामाचा ताण
कामामुळे दिवस पडतो सगळ्या गृहिणीना लहान
नसतो तिला वेळ, लागली कितीही असो मग तहान
दिवसात किती काम करते याचाही नसतो भान
काय करणार एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही ..

उठल्या उठल्या सुरू होते तिचे काम
गृहिणीला वाटत नसते का, कराव थोडं आराम
दुसऱ्यासाठी निर्णय घेताना मत आहे तिचा ठाम
स्वत:साठी नाही विचार करत, मग कितीही गळो घाम
काय करणार एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही ..

घरच्या मंडळीकडे देत असते सतत लक्ष
स्वतःच्या तब्येतीकडे, मग का करते दुर्लक्ष
कुटुंबाच्या लोकानी सुद्धा असलं पाहिजे दक्ष
गृहिणी ही नेहमी असते कर्तव्यदक्ष
काय करणार एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही ..

जायचं असलं जरी तिला गावाला
घरचं पहिले पूर्ण काम घेते करायला
का बरं कधी देत नाही महत्व स्वतःला
गृहिणीने कधी तरी जायला पाहिजे फिरायला
काय करणार पण एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही ..

गृहिणीने वेळ काढून करायला पाहिजे कसरत
नाहीतर वेळ निघून जाईल आणि तब्येत जाणार घसरत
कुटुंबाचे लोकांनी सुद्धा केली पाहिजे गृहीणींना मदत
स्वतःकडे बघायला कोणी घेत नसते हरकत
काय करणार पण एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही ..

कोणी नाही विचारलं तरी असते ती समाधानी 
काटकसरी पणा मुळे कधी करत नाही मनमानी
आता घरचे निर्णय पण तिनी घ्यावे हक्कानी
शिकायला पाहिजे तिनी पण जगायचं सुखानी 
काय करणार पण एखाद्याच्या स्वभावाला औषध नाही .. 

कुटुंबाला नेहमीच ठेवते ती बांधून
सगळ्यांचे काम स्वतःवर घेते ओढून
गृहिणीने जीवनाचे आस्वाद घेतले पाहिजे अधून मधून
वेळ आहे आता स्वतः मधले गुण घ्यायचे शोधून
गृहीणींना आता स्वभावावर औषध शोधण्याची गरज आहे  ..

.    .    .

Discus