Image by Hans from Pixabay

किती गोष्टींचा आता राहत नाही आम्हाला भान
थोडे से कमी ऐकू येणारे झाले आमचे कान
कधी कधी जीवनात आले काही ताण
तरी होती हातात जीवनाची कमान
इतक्या वर्षी राहिले आमचे ताठ मान
असच असू दे उरलेले जीवन छान
आम्ही काय पिकलेले पान ...
कोणावर ही नाही राहिलो आम्ही अवलंबून
उरलेल्या आयुष्यात कोणीही घेईले सावरून
आम्हाला सुद्धा नवीन गोष्टी घ्यायाची आहे समजून
खूप काही घेण्यासारखे आहे नवीन पिढी कडून
गरज वाटते म्हणून मोबाईल पण घ्यायच आहे शिकून
नाही तर अशाच वेळ जाईल आमचा निघून
आम्ही काय पिकलेले पान ...
इतक्या वर्षाचा अनुभव आहे आम्हाला
आवडेल पारंपरिक पद्धतीचा जेवण शिकवायला
पूर्वीची गोष्ट आणि कथा तुम्हाला सांगायला
नात, नातू यांना आनंदाने जेवण भरवायला
शिकून घ्या घरगुती उपचार करायला
समजून घ्या, फायदा होईल तुम्हाला
आम्ही काय पिकलेले पान ...
कीर्तीच्या मागे धावून, नका करू तळमळ
एका सोबत खूप काही करायला घेतले की होते धावपळ
आमच्या सारखे जीवन जगुन बघा, नाही होणार तारांबळ
धैर्य, निष्ठा ठेवा, नाही होईल कधी गोंधळ
धीर धरा, पैशाचा मागे नका करू पळापळ
फक्त असूद्या ठाम असे मनोबळ
आम्ही काय पिकलेले पान ...
खूप लवकर शक्यता आहे पडण्याची
तरी ओढ आहे काहीतरी शिकण्याची
गप्पा करून वेळ वाया नाही आम्हाला घालवायाची
गरज आहे नवीन पिढी सोबत पुढे चालण्याची
वेळ झाली आता आपली संस्कृति आणि वारसा सोपण्याची
नव्या पिढीला सुद्धा गरज आहे है सगळं जपण्याची
आम्ही काय पिकलेले पान

.    .    .

Discus