दिवसभर कामासाठी करून राहिले पळापळ
एकासोबत इतके काम करणार, होणारच मग गोंधळ
जीवनाचा होयू नका देऊ खेळ
मग विचार करत बसणार कुठे गेला आपला वेळ .
घर, कुटुंब, नौकरी याच्यात रोज होते धावपळ
माहीतही नाही पडत कधी होते सकाळची संध्याकाळ
दररोज डोक्यात कामाची नेहमी होत असते भेळ
मग वाटते की कुठे आहे माझ्या कडे वेळ .
कामात इतके गुतून गेलो, घडवण्यासाठी भविष्यकाळ
इतका आतापीटा कशासाठी जेव्हा खराब होतो वर्तमानकाळ
कामाचा नाही जमते जेव्हा ताळमेळ
मग वाटते की नाही उरून राहिला आपल्याकडे वेळ .
जीवन होत आहे आपला खडकाळ
अजून जीवन जगायचं आहे आपल्याला दीर्घकाळ
वेळेचा आणि कामाचा बसवाव मेळ
मग खूप गोष्टी करण्यासाठी मिळेल थोडा तरी वेळ .