Photo by Uvesh Gogda: Pexels

सकाळची वेळ असेल, साडे नऊ वाजले असतील.. स्वारगेट ला जाणाऱ्या बस ची वाट पाहत मी उभा होतो... शेजारीच असलेल्या मुलाला विचारले, बस गेली का? त्याने माझ्या कडे पहात उत्तर दिले "नाही अजून".. मग मी शेजाराच्या पानाच्या टपरी वर गेलो.. एक क्लासिक माईल्ड. सिगारेट घेऊन, टपरीला अडकवलेल्या लाय टर ने सिगारेट शिलगावून.. एक झुरका मारला.. आणि आकाशा कडे तोंड करून धूर हवेत सोडला.

"बाबा तुम्हाला जुस प्यायचाय का?" एका मुलीचा आवाज कानावर पडला.. मी आवाजाच्या दिशेने बघितले.. एक बावीस-तेवीस वयाची तरुणी, एका वृद्ध आजोबांना विचारात होती.. साधारणत: सत्तर वय असेल.. बारीक शरीरायष्टी.. पांढरे धोतर व पांढरा सदरा.. डोक्यावर सफेद गांधी टोपी.. व पायात कोल्हापुरी चप्पल.. त्यांनी मान हलवताच तिने त्यांना हाथ धरून समोरच्या जूस च्या टपरीवर नेले... त्यांना पाहिजे असलेला जूस घेऊन दिला..जुस वाल्याला पैसे दिले आणि आजोबांना, "सावकाश प्या" म्हणून परत रस्ता क्रॉस करून बस स्टॉप वर आली.. मी पहिले कि आजोबांनी हात वर करून तिला आशीर्वाद दिला होता.

जवळ आल्यावर मी त्या मुलीला त्या आजोबांबद्दल विचारले.. ती म्हणाली कि ते इथे रोज दिसतात. ते भेटले कि आम्ही त्यांना चहा, जूस वैगेरे देतो.. माझ्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव पसरले, कारण आजोबा तर चांगल्या घरातील दिसत होते.. त्यांनी घातलेले कपडे पण स्वच्छ होते.. तेवढ्यात बस आली व मी बस मध्ये बसलो.. बस मध्ये बसल्यावर मी त्यांचाच विचार करत होतो.. पण नंतर कामामुळे त्यांचा जास्त विचार आला नाही.

दोन -तीन दिवस गेले असतील मी रात्री उशिरा घरी परतलो.. घर म्हणजे मी नुकताच काही दिवसापूर्वी एक शेरिंग फ्लॅट घेतला होता.. साधारणत: रात्रीचे अकरा वाजले असतील.. बस मधून उतरून चालत असताना माझी नजर उजवीकडे गेली.. एका कपड्याच्या बंद शॉप च्या समोर एका सतरंजी वर तेच आजोबा झोपले होते. मी रस्ता क्रॉस केला आणि त्यांच्या जवळ गेलो. "आजोबा झोपला का? "माझा आवाज ऐकून त्यांनी हळूच डोळे उघडले आणि उठून बसले.. मी म्हणालो "अरे झोपा तुम्ही.. उठू नका"

सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्या वर मला हलकेसे हास्य दिसले. "जेवण केले का" मी प्रश्न केला. "आणि इथे का झोपलाय?" त्यांच्या बोलण्यातून मला समजले कि त्याच बिल्डिंग च्या चावथ्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहतो.. ते घरी जेवण करतात व रात्री खाली झोपायला येतात. मी त्यांच्या शेजारी थोडा वेळ बसून, रूम वर आलो.. रूम वर आल्यावर मी झोपताना विचार केला कि उद्या दुकानातून एक ब्लॅंकेट घ्यावे आणि त्यांना द्यावे.. तसेही दिवस थंडीचे होते.. त्यांना त्याची गरज भासेल.

दुसऱ्या दिवशी मी एक दुकानातून ब्लॅंकेट खरेदी केले.. व काल जिथे झोपले होते तिथे आलो.. दुकान अजून बंद झालेले दिसत नव्हते.. पण त्यांचा बिछाना बाजूलाच दिसला.. शेजारी प्लास्टिक ची फुले.. प्लास्टिक ची खेळणी.. मी दुकानदाराला विचारले "आजोबा कुठे गेलेत?"तो म्हणाला कि जेवायला वर गेलेत. येतील थोड्या वेळाने. मी प्लास्टिक च्या फुलांकडे बघून विचालले "ही फुले कोणाची आहेत?" .. त्याने सांगितले कि ते रोज स्वतः फुले बनवतात व ती फिरून विकतात.. मला आश्चर्य वाटले.. कि ह्या वयात सुद्धा आजोबा काम करतात? मी थोडा वेळ त्यांची वाट पहिली पण ते आले नाहीत. जेवण करायचे होते म्हणून मी दुकानदाराला म्हणालो कि हे ब्लॅंकेट मी इथे ठेऊन जातो.त्यांना सांगा.. मी ब्लॅंकेट बिछा न्याजवळ ठेवले व रूम वर आलो.

एक आठवडा गेला असेल मी स्वारगेट ला विश्रांतवाडी ला जाणाऱ्या बस ची वाट पहात उभा होतो.. माझे सहज समोर लक्ष गेले तर आजोबा एका बस मधून उतरत होते.. त्यांना पाहताच मी आवाज दिला "आजोबा "त्यांनी माझ्याकडे बघितले व एक स्मित हास्य दिले.. माझ्या जवळ आले व म्हणाले "लग्नाला चाललोय.. हडपसर ला " माझ्या मनात काय विचार आला माहित नाही पण मी खिशात हात घालून एक शंभराची नोट काढली व त्यांच्या हातात दिली. "असुद्या तुमच्या जवळ "त्यांनी ती घेऊन.. आशीर्वाद दिल्या सारखे दोन्ही हात उचलले.. मी हलकेच स्माईल केले आणि माझी बस येताच निघून गेले.

मग मात्र ते मला आधीमाधी खेळणी व फुले विकताना रस्त्यावर दिसत.मला पाहून हास्य करत व निघून जात.. मी ही कधी कधी त्यांना भेटले कि चहा पाजत असे.. मी माझ्या कामामध्ये बिझी झालो.. व त्यांच्याशी भेटनेही कमी झाले.. एके रात्री मी रूम वर येताना दुकाना समोर पहिले तर मला आजोबा काही दिसले नाहीत.. मी थोडासा कासावीस झालो.. व तसाच रूम वर येऊन झोपून गेलो..

सकाळी कोणाच्या तरी जोराने ओरडण्यामुळे मला जाग आली.. खिडकीतून पाहिले तर खाली तेच आजोबा कोणावर तरी ओरडत होते.. मी ब्रश करून खाली आलो. मला त्यांचा बिछाना एका छोट्या गणपतीच्या मंदिरा जवळ दिसला आणि त्यांच्या जवळ जाऊन विचारले कि.. "इथे का?" ते म्हणाले कि" दुकान वाल्याने तिथे झोपू नाही दिले. "मला काहीच समजले नाही मग तुमचा मुलगा तो तर वर राहतो ना? त्यावर आजोबांनी उत्तर दिले. "मला कोणाची गरज नाही.. मी एकटा खंबीर आहे " समोरच्या मेडिकल मधून एक वृद्ध गृहस्त माझ्या कडे पहात होते.. मी त्यांच्या कडे पाहिले तर ते हसत होते.. मग मी अजूनच कोड्यात पडलो.. आजोबांकडे मी बघितले.. व त्यांना विचारले "चहा प्यायचाय का?"

त्यांनी नाही म्हणताच मी चहा पिऊन आलो आणि मेडिकल वाल्या दुकानात घुसलो.. मी आत मध्ये येताच त्यांनी विचलराले "तुम्हाला त्या बाबांबद्दल विचारायचंय ना?" मी हो म्हणालो.. मेडिकलवाल्याने मला जे सांगितले तसा मी स्तब्ध झालो.. त्यांनी सांगितले कि" हे बाबा पूर्वी बैलांचा व्यपार करायचे.. पन दारूच्या व्यसना मुळे रोज मुलाशी व सुनांशी भांडण करतात..त्यांना शिव्या देतात. मुलगा आता फ्लॅट सोडून दुसरी कडे राहायला गेलाय.. पण त्याला सांगितले कि मी तुझ्या बरोबर राहणार नाही.. एवढे चांगले घर असून हे बाहेर रस्त्याच्या कडेला झोपतात व रोज रात्री दारू पितात.. "मी ऐकत होतो.". जर फुले विकली तर ठीक नाही तर रोज कोणी ना कोणी जेवण देते, पैसे देतात.मग हे त्या पैशाची दारू पितात इथे शेजारी मेडिकल कॉलेज आहे ना.. त्या मधील मुले मदत करतात. "मी अस्वस्थ झालो.."मग वृद्धाश्रमात का नाही राहत?" मी विचारले. "तिथे रोज दारू प्यायला मिळेल का?" त्यांनी उत्तर दिले. त्या दिवशी माझे कशात लक्ष लागले नाही... मी त्या आजोबांचाच विचार करत होतो.

असेच काही दिवस गेले.. रात्री रूम च्या खिडकी तुन खाली पहात होतो. समोर आजोबा जेवायला बसले होते.. बहुतेक कोणी तरी जेवण आणून दिले असेल.. मी तसाच एकटक बघत राहिलो.. आजोबांनी खिशातून एक देशी दारूची बाटली काढली. तिचे झाकण उघडले आणि ती बाटली तशीच तोंडामध्ये मोकळी केली.. आणि शेजारी फेकून दिली. मी खिडकी तुन बाजूला झालो.. मला काही सुचेनाशे झाले. ह्म्म्म असे उदगार माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि तसाच सुन्न पणे माझ्या बेड वर पडलो.

.    .    .

Discus