आई तुला कुठल्या शब्दांनी साद घालू ..बय, माय, मा, मा..व, ममता, जन्मदा, माऊली, जन्मदात्री,जननी, कल्पतरू,सौख्याचा सागर अशी माझी माय.

आई म्हणजे चालत बोलत विद्यापीठच, साधी राहणी, अत्यंत कष्टकरी, जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि आयुष्यातली सर्वोत्तम कुक, झटपट होणार पदार्थ म्हजने झुणका- भाकर, बटाटा दगडाने ठेचून तव्यावर दिलेली फोडणी, व तुरीच्या हंगामातील सोले, सणावाराला गोडधोड म्हणजे उत्तम पुरण पोळी, शाळेची सहल असेल तर आईचा ठरलेला मेनू शिरा-पोळी, मी तर सहलीची दरवर्षी वाटच बघायचो, अहो आई म्हणजे सुगरणच।। माझी आई अशिक्षित असून सुशिक्षितांसारखे माझ्यावर संस्कार केले, दिवसभर शेतात काबाडकष्ट करून आल्या नंतरही आम्हाला कथा सांगायची, त्या कथा बोध घेण्या सारखाच असायचा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे आईच्याच काव्यातून कळले, एक दोन तीन चार भैया बने होशियार हे गाणं नेहमी कथे चा समारोपाला म्हणायची.

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे पण तो फुकटचा नको ,स्व-कमाईचा असावा, कुठल्याही प्रकारची चोरी करायची नाही अशी शिकवण, एकदा तर मी शेजाऱ्याचा घरून गंजीपा (52 पाणी cat) चोरून आणला आणि एकटा न्याहाळत बसलो, आईच लक्ष गेले आणि माझा कान पकडून शेजाराकडे मला फरफटत घेऊन गेली, तो माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल होता, ही आईची शिकवण,

खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. अगदी आईपासून ते आईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्कार घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्या शिवाय कोणीही घेऊ शकत नाही.

थोडं विषयांतर करतो.. (वाचकांनी रडायचं नाही )

पवन हा एकुलता एक मुलगा, आईने काबाडकष्ट करून डॉक्टर बनविला, वडीलाच क्षेत्र बालपणीच हरवलं होत, वडीलाच स्वप्न म्हणून पवन पण डॉक्टर झाला, सुट्टी मध्ये गावी आला तर आई ला क्षणभर पण सोडत नव्हता, आई मनोमन सुखायची, स्वप्नाच्या गावात जायची, मला अशी सून हवी तशी-सून हवी आणि गोरी पण हवी हो, मिळेल त्या बायकांना सांगत सुटायची... मिळेल त्या बायकांना सांगत सुटायची, पवन ने पण झोपडी वजा घराला टुमदार बंगल्याचा साज दिला, पण पवन या सुट्टी मध्ये आईला वेळ देत नव्हता, शेवटी ती आईच - आई सून संशोधनाला निघाली आणि पवनची बाहेर देशात जाण्याची लगबग, कुठेतरी पाल चुकचुकलीआणि आईला जणूकाही भासच झाला, अरे पवन पंतांच्या बकुळीच स्थळ आवडेल का तुला, मी तर बकुळी मध्ये उत्तम गृहिणी चे स्वप्न बघितलं बाबा, आई.... तुला कस सांगू मी प्रेम विवाह केला आहे, सीमा नाव तीच, ती भारतीयच आहे, तिचे वडील लक्षरात होते, सीमा आणि मी एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करतो, त्यात काय वाईट, आईचे कान बधीरल्या सारखे झाले, मन सुन्न झाले, आठवले ते वडील ..तिला जिवंतपणी स्वर्गच दाखवला मुलाने...

जिवंतपणी स्वर्गच दाखवला मुलाने, आई ला वृद्धाश्रमात ठेऊन पवन विदेशात निघून गेला . अरे तुमची कुत्री ऐसी मध्ये झोपवता आणि ऐसी गाडीने फिरवता आणि जन्मदात्या आई ला वृद्धाश्रमात ठेवता , हीच का तुमची कर्तव्य?????

आई वृद्धाश्रमात शरीराने आणि विचाराने पण थकली होती, सारखी वाट बघायची पवनची माझं बाळ जेवला असेल का, झोपला असेल का, अरे ती आईचं।। तू आईला कुत्र्या सारखी जरी वागणूक दिली तरी ती तुला देणार आशीर्वादच।।

आई पण जिद्दी ना माझा पवन ला बोलवा, जो भेटेल त्याला सांगत होती, वृद्धाश्रम संचालकांनी पवनला मेहरबानी खातर विदेशातून बोलावून घेतले, आईने ठेवलेली पुंजी आणि बंगला त्यालाही लिलावात काढायचा होताच, बायकोची परवानगी घेऊन भारतात आईला भेटायला वृद्धाश्रमात गेला...आवारात गर्दी जमली होती, तसं त्याला रागरंग समजायला लागला.....काहीतरी वेगळं घडलं होत, जसा जवळ जात होता तसे जवळची नातेवाईक दिसत होते ... आवारात तिरडी बांधलेली होती बाजूला ओसरीवर त्याचा आईचे निष्प्राण शरीर एका सतरंजीवर चादर टाकून ठेवले होते.. .तो एका क्षणात सर्व काय प्रकार ते समजला... त्याचे हातपाय गार पडले... घसा कोरडा पडला... क्षणभर तो स्थंभित झाला आणि मग जिवाच्या आकांताने त्याने कळवळून आवाज दिला..आई...sssssssss।।

मनाला पिळवटून टाकणारा त्याचा आक्रोस आकाशाला चिरून पार पलीकडे गेला होता... पण वेळ निघून गेली होती ।

.   .   .

Discus