डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यभरात समाजजीवनाशी संबंधित असंख्य क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांचे हे विपुल्य कार्य कैक पिढ्यांसाठी दीपस्तंभ बनले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर हे कर्तेसुधारक होते. सर्व माणसे समान आहे. कोणीही उच्च नाही किंवा नीच नाही. या व्यवस्थेत शुद्ध मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार ह्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीमधून, विचारांतून त्यांनी समानतेचे धडे दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय याबाबतचा होता. त्यांच्या या विचारांनी भारतात सामाजिक क्रांती घडून आली. त्यामध्ये त्यांनी सामाजिक लोकशाही विचारांचा पुरस्कार केला. सामाजिक लोकशाहीत वंचित वर्गाला संधीची समानता देऊन समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते ठरतात. कारण अर्थतज्ञ, जलतज्ञ, ऊर्जांतज्ञ, कायदेतज्ञ, शेतीतज्ञ शिक्षणतज्ञ, इतिहासतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जागतिक तत्त्वज्ञ, संरक्षणतज्ञ, विकासतज्ञ, कायदेतज्ञ, शेतीतज्ञ, मुरब्बी नेता, ग्रंथकार, व ग्रंथप्रेमी, प्राध्यापक, परराष्ट्र धोरणरकर्ता, प्रभावी लोकसंवादक, झुंजार संपादक, कृतिशील वक्ता, धर्मसुधारक, कामगार नेता, राज्य घटनाकार, मानवंशशास्त्रज्ञ असे आदी असंख्य पैलूंतून त्यांचे विश्वरूप आपल्याला दिसते.

भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधान निर्मितीतून त्यांचे हे श्रेष्ठत्त्व अधोरेखित, प्रमाणित होते. भारतासारख्या खंडप्राय देशात प्रादेशिक. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक विविधिता मोठ्या प्रमाणात आहे. व विविधतेतूनच देशाच्या अखंडतेसमोर कधी-कधी आव्हाने निर्माण होतात. मात्र विविधतेतूनच एकटा साधणाऱ्या संविधानामुळे अखंड एकसंघतेचा प्रवाह निथळ होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचे फार अवघड केले आहे. संविधानातून त्यांनी एक राजकीय तसेच सामाजिक क्रांतिकारी सिद्धांतच अस्तित्वात आणलेलं आहे.

एक चिकित्सक समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी चिरंतन दिशा देणारी आहे. त्यांनी भारतीय समाजव्यवस्था, प्राचीन काळातील सामाजिक जीवन आणि जातीव्यवस्था, अस्पृश्यता याविषयी अतिशय वस्तुनिष्ठपणे अध्ययन करून लेख, भाषणे, ग्रंथाद्वारे, महत्वपूर्ण मांडणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या २५व्या वर्षी कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्र परिषदेत ९ मे १९१६ ला 'भारतातील जाती: घडण, उत्पत्ती आणि विकास हा शोध निबंध सादर केला होता. जाती व्यवस्थेच्या उत्पत्तीचा सिद्धांत, जाती कशा निर्माण झाल्या, त्या का टिकून राहिल्या या संबधीचे त्यांनी मानवंशशात्रीय आणि समाजशास्त्रीय विश्लेषण केले. लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या परिषदेसाठी त्यांनी लिहिलेल्या भाषणातून त्यांचातील समाजशात्रज्ञ दिसून येतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ ते १९४६ च्या दरम्यान व्हॉईसरॉय मंत्रिमंडळात असतांना जलनितीविषय क्षेत्रांत भरीव काम केले आहे. त्यांनी कृषी, जलसंपदा, श्रम, सिंचन व वीज क्षेत्रांत शाश्वत विकासाच्या संकल्पना व प्रकल्प राबविले आहेत. या प्रत्येक क्षेत्रात शाश्वत विकासाचे मॉडेल विकसित करता येण्यासाठी दिशा दर्शन केलेलं आहे. दामोदर नदी खोरे प्रकल्प, महानदी खोरे विकास प्रकल्पातील हिराकूड धरणाची निर्मिती सोननदी प्रकल्प व जलविद्युत प्रकल्प नदी खोरे प्राधिकरण, सिंचन व विद्युत शक्ती, आंतरराज्य नद्यांचे जाळे, समान पाणी वाटप या संकल्पना मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रनिर्मितीचा पाया घातला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून २ जुलै १९४२ रोजी नेमण्यात आले. १९४२ ते १९४६, या कालावधीत त्यांनी भारताचे मजूरमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. मजुरांच्या विविध प्रश्नावर काम केले असल्याने मंत्रिपदावर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांकरिता महत्वपूर्ण कायदे व सुधारणा घेऊन आणल्या. महागाई भत्ता, पगारी रजा, प्रसूती रजा, संप करण्याचाअधिकार, कल्याणकारी मंडळ आदी विविध निर्णय त्यांनी घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अभ्यासू शेतीतज्ञही होते. शेती व विकासाबाबत त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांना भारतीय कृषी व्यवस्थेची चांगली जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समान रित्यापुरवठा झाला, तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांचे मत होते. खोती पद्धतीमुळे शेतकऱ्यांवर खूप अन्याय होत असे. खोती पद्धत नष्ट करणारे कायदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अव्वल दर्जाचे संसदपटू होते. मुंबई राज्य विधानसभा व भारतीय राज्यसभा सदस्य असताना त्यांनी केलेले कार्य त्यांच्या संसदपटुत्वाची साक्ष देते. विध्यार्थीदशेपासून अखेरपर्यंत एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संघर्षमय वाटचाल नव्या पिढीसाठी स्फूर्तिदायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रभावी लोक संवादक होते. हिंदी, मराठी इंग्रजीसह विविध परदेशी भाषांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रभुत्व होते. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी साधलेला लोक संवादक हा महत्वाचा पैलू आहे.

संरक्षणतज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वपूर्ण पैलू देशाला दिशा देणारा आहे. दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यातील धुमसणारा संघर्ष कमी करण्याचे यथायोग्य उपाय त्यांनी सुचविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारताची निर्मिती करताना जी भूमिका मांडली होती. ती अत्यंत मूलभूत, राष्ट्राची एकसंघता एकात्मता टिकविणारा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्याचे तौलनिक अवलोकन करून तेथील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती भाषा जाती, अल्पसंख्यांक जाती यांचे प्रमाणभूत मूल्यमापन केले.

'एक राज्य एक भाषा' या तत्वामुळे जातीय वैमनस्य व सांस्कृतिक संघर्ष कमी होईल, असेहि त्यांना वाटत होते. मुंबईसह महाराष्ट्र असावा हि भूमिका सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. तेथूनच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु झाला. राज्य पुनर्रचना आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्यावर भाष्य करताना व संघराज्य हि संघर्ष राज्ये बनू नयेत यासाठी त्यांनी भारताला दिल्लीबरोबरच आणखी एका राजधानीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यासाठी देशाचे एक मध्यवर्ती व सुरक्षित ठिकाण सुचविले होते, ते म्हणजे हैद्राबाद. परंतु तत्कालीन ब्रिटिश काँग्रेसच्या राष्ट्रीय पुढाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हि भूमिका समजून घेण्याची क्षमता नव्हती. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींचे दुष्परिणाम भोगल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या उपायांची काही प्रमाणात पुर्तता करण्याची मानसिकता तयार झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील एक अग्रणी शिक्षणतज्ञ होते. बहुसंख्य मानव समूहाला लोकशाही प्रक्रियांद्वारे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मधील करून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणास महत्वाचे साधन मानत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा आणि सार्वत्रिकरणाचा आग्रह धरला. शिक्षणावरचा खर्च भागविण्यासाठी सरकारने करावयाच्या विविध उपाय योजनांबाबत त्यांनी दिशा निर्देश केले होते. दलितांसाठी शासनसेवेत राखीव जागांचा आग्रह धरला. उच्च शिक्षण, समाजाभिमुख विद्यापीठ निर्मितीसाठी अध्ययन-अध्यापनविषयक व्यवहाराचा केंद्रबिंदू असलेली विद्याशाखा, विद्यापीठ विधानविषयक अधिकाराचे केंद्र म्हणून सिनेट, विद्यापीठ व्यवहाराची केंद्रीय कार्यकारिणी असणारी सिंडिकेट आणि विद्यापीठ कारभाराची समन्वयक असणारी विद्ववतसभा या चुतर्मुखी योजनेचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला . व्यक्तिमत्व विकासासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी सदन मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक तत्वज्ञान मांडताना असे म्हणतात, " जे जातिव्यवस्थेला सुरुंग लावून उडवून देण्याची इच्छा बाळगतात त्या भारतीय समाजातील खालच्या वर्गाला जर आम्ही शिक्षण दिले तर ते जातीव्यवस्था पूर्णपणे नेस्तनाबूत करतील. हि जातीव्यवस्था उडवून लावणाऱ्यांना जर शिक्षण दिले तर भारतीय लोकसत्ताक पद्धती सुरक्षित हातात सोपविल्यासारखे होईल. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उद्दिष्ट स्पष्ट करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, ''पीपल्स एज्युकेशन सोसायटी" चा हेतू केवळ शिक्षण देण्याचाच नव्हता, तर भारतामध्ये बौद्धिक, सामाजिक, नैतिक लोकशाहीचे प्रचलनकरता येईल, अशा रीतीने शिक्षण द्यावयाचा होता. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाही मूल्ये भारतीय जनसामान्यात रुजवायची होती हे स्प्ष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत, समता या नियतकालिकांतून बिर्भीड, खणखर, झुंजार पत्रकारिता केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजपरिवर्तनाच्या कारणासाठी केलेल्या पत्रकारितेत मूलभूत असाच होता. दलित शोषितांच्या भावभावनांच्या वाचा फोडण्याच्या प्रयत्नातून त्यांनी वृत्तपत्रांची निर्मिती केली. विशेषतः असे नमूद करतांना वाटते कि, जनता या वृत्तपत्रातून २ डिसेंबर १९३३ च्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हणाले होते कि, समाजाच्या अवस्थेकडे पाहताना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध प्रतीकात्मक प्रबोधनाचे शस्त्र हे जनता या वृत्तपत्रातून होऊ शकते म्हणून वृत्तपत्राचा प्रसार विशेषतः जनता याने लोकजागृतीचे कार्य आरंभिले असून आपला सर्वांगीण उन्नतीचा लढा देणे आवश्यक आहे. त्याकरिता धैर्याने तोंड देऊन व आपल्या वर्तमान पत्राला जिवंत ठेवण्याकरिता सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आपल्या जनसमुदाय बांधवाना सांगत असे. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हि काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता नव्हती तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. याबाबीकडे या क्षेत्रातील तज्ञांनाही एकत्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले किंवा पारंपरिक मानसिकतेमुळे यापत्रकारितेची दखल घ्यावी असे त्यांना वाटले नसावे, याची खंत वाटून राहते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार भारतासाठी दिशादर्शक आहेत. त्या काळातील दिग्ग्ज अशा देशी व विदेशी अर्थशात्रज्ञांनी त्यांच्या विचारांची दखल गांभीर्याने घेतली. रुपयांची वर्तुणूक त्यांचे मूल्यांकन या बाबतीतीतलं त्यांचे लेखन आजही आपणांस स्तंभित करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रातील “म्हणजे 'क्रयशक्तीची समानता या मूलभूत संकल्पनेवर खूप खोलात जाऊन विचार केला होता. त्या-त्या वस्तूचे आयात-निर्यात हि वस्तूच्या संबंधाने असलेल्या मागणी पुरवठा या बाबीनुसार व रुपयांच्याच शक्तीवर अवलंबून असावी, असा पायाभूत विचार मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपयाच्या समस्येवरील प्रबंध आजसुद्धा तंतोतंत अर्थव्यवस्थेला लागू होतो. अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी व कार्य भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लाख मोलाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्रीय धोरणाचे दूरदृष्टीकोनात्मक विचार मांडताना असे म्हणणे होते कि, परराष्ट्र धोरण हे विचारसरणीवर अथवा भावनांवर आधारित असू नये तर ते वास्तववादी आणि व्यावसायिक असले पाहिजे. परराष्ट्र धोरण हे मुलांबरोबरच राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य देणारे हवे, अशी त्यांनी सातत्याने मांडणी केली. परंतु स्वातंत्रोत्तर परराष्ट्र धोरणावर पंडित नेहरू यांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फारसे प्रकाशात आले नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ६५ वर्षाच्या लाभलेल्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक अशा चारही क्षेत्र पदांक्रांत केली. या पराक्रमाला, धैर्यशिलेला जोड होती ती म्हणजे भावनिकतेची, करुणाची विशेषतः स्त्रियांकरिता त्यांच्या मनात तळमळता होती. स्त्रिया आणि शूद्रादि प्रजेवर जातिव्यवस्थेने केलेल्या पराकोटीच्या अन्याय-अत्याचारांची चीड व त्या शोषणाला बळी पडलेल्यांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात सामाजिक क्रांती घडवून आणली. महिलांचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आकारास आणले. महिलांचा वारसा हक्क, पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, अज्ञानत्व व पालकत्व याबाबतचे कायदे या हिंदू कोड बिलात समाविष्ट करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय घेऊन आणला. हिंदू कोड बिल म्हणजे भारतीय महिलांसाठी सुरक्षकवच जणू होते. भगवान गौतम बुद्धानंतर हि दुसरी क्रांती होती असेच म्हणावे लागेल. म्हणूनच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “महिलांचे कैवारी” असे संबोधिले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयातही विपुल कामगिरी केली होती. त्यांचा कायदेविषयक अभ्यास हा अत्यंत अलौकिक आहे, हे सर्वमान्य झालेले आहे. कायदा म्हणजे समाज परिवर्तनाचे प्रमुख माध्यम आहे. कायद्याला कृतिशीलता कार्यक्रमाची जोड दिल्यास समाज निश्चित परिवर्तित होतो यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निष्णांत वकील होते. वकिलीचा वापर करून त्यांनी सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेला अधिक गतिमान केले. बागडे, जेधे, जवळकर खटला. र. धों. कर्वे मानहानी खटल्यांसोबतच शामराव परुळेकर खटला, कामगारांसाठी काम करणारे कार्यकर्ते, नेत्यांवरील खटले त्यांनी जिंकले. समाजव्यवस्थेतील आर्थिक अन्याय, पिळवणूक पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सावकारी नियंत्रण विधेयक मांडले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२४ तसेच १९३४ दरम्यान वकिलीसोबतच समाजभान जपणारे वकील तयार व्हावेत यासाठी मुंबई येथे शासकीय विधी महाविद्यालयात प्राध्यापकही म्हणून कार्यभार सांभाळला. २ जून १९३५ रोजी त्यांना सरकारने विधी महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून नेमून केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे शिक्षण हे इतर तांत्रिक शिक्षणासारखेच पदवी शिक्षण असावे, असे प्रतिपादन केले. मे१९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या कार्याबद्दल विधी महाविद्यालयाच्या मासिकात गौरव करतांना लिहिले होते कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान व कर्तृत्वाविषयी विध्यार्थ्यांना आदर वाटत असे. त्यांची व्याख्याने व्यासंगपूर्ण असत, त्यांचे विचार नेहमीच क्रांतिकारक असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथप्रेमी, ग्रंथकार हा आणखी एक महत्वाचा पैलू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळपास २६ हुन अधिक ग्रंथ, शोधनिबंध अहवाल अशी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यात दोन शोधनिबंध, दोन निबंध तीन लेख, एक अहवाल, पाच भाषणे आणि दहा ग्रंथ आदींचा समावेश होतो. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांभीर्याने विचार करीत असत. आपल्या लेखनांतून ते आपली भूमिका मांडत असत. त्यांचे हे विचार क्रांतिकारक नेत्यांसारखे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानववंश शास्त्रबाबतही गाढ अभ्यास होता. मानवी क्रमिक विकास, मानवाचा समाज, प्राचीन धर्म, संस्कृतीशी असलेला संबंध तसेच इतिहास निर्मितीमध्ये मानवी प्रयत्नांची पराकाष्टा याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्थापत्य कलेचाही अभ्यास होता. त्यांनी वैधकशास्त्राबद्दलही खूप वाचले होते. बागकामाची आवडीसोबतच बागेची रचना, फुलझाडे याबाबत त्यांना रस होता. पर्यावरण प्रेमी बाबासाहेब असे त्यांना म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संगीत प्रेमी हि होते. गायन वादनाची त्यांना आवड होती. १९३७-३८ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गायन कला व वाद्य कला अवगत केली होती. वैद्य नावाचे गृहस्थ दादर येथील निवास स्थानी फिड्ल वाजविण्यास शिकविण्यास येत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूकडून व्हायोलीनचे धडे (१९५१ ते १९५४), साली घेतले होते. त्यामागेही त्यांचं व्हायोलिन शिकण्या मागची मानसिकता अभ्यासूवृत्ती लक्षात येते. त्यांचे असे म्हणणे होते कि, तंतुवाद्यांतून निघालेले सूर मनुष्याला ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. त्यांना संगीताची देखील आवड होती. त्यांच्याकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. प्रदेशात नेहमी येणे जाणे असल्याने त्यांनी हा छंद जोपासला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरातील शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लहान पानापासून चित्रकलेचे आवड होती. त्यांनी दहावीत असताना पेन्सिलने काही चित्रे रेखाटली होती. त्यांना चित्रकला शिकविण्यासाठी चित्रकलेचे शिक्षक मार्गदर्शन करीत असत. त्यांच्याकडून त्यांनी चित्रकला उत्तमरीतीने शिकली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ च्या दरम्यान तथागत बुद्धांचे पेन्सिलने एक सुंदर चित्र रेखाटले होते. या चित्रकलेचा अतुलनीय नमुना नागपूर जिल्ह्यातील चिंचोली गावातील शांतीवन स्मृती संग्रहालय उपलब्ध आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साहित्य चिकित्सेची सुरुवातीपासून आवड होती. विद्यार्थीदशेत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेक्सपिअर लिखित 'कींगलीअर' या नाटकाचा अनुवाद करून 'शहाणी मुलगी' या शीर्षकाने लघुनाट्य स्वतः अत्यंत प्रभावीपणे सादर केले होते. याचा संदर्भ चांगदेव खैरमोडे यांच्या डॉ. आंबेडकर चरित्राच्या पहिल्या खंडात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनता मधील लेखात प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राह्मण या नाटकाचे नाटककारांनी चालविलेला अस्पृश्यता निवारण या मथळ्याखाली नाट्य परीक्षण केले होते. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नवा पैलू आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे नाट्यप्रेमी अथवा नाटककार होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या नाट्य परीक्षांची समीक्षा हि तर निरपेक्ष आहेच शिवाय तितकीच प्रखरही आहे हेही लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणशैली हा वैशिट्यपूर्ण असा पैलू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम वक्ते होते. त्यांनी विधिमंडळात आपल्या वक्तृत्वशैलीने सर्व पक्षांवर आणि सदस्यांवर बाणेदारपणाचा प्रभाव पडला होता. त्याच बरोबर सार्वजनिक सभेमधूनही आपली उत्कृष्ट वक्तव्याची जादू श्रोत्यांवर पडत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषशैली अमोघ स्वरूपाची होती. प्रत्येक मुद्द्यांचा सविस्तर परामर्श करण्याची किमया त्याच्यामध्ये होती. प्रतिपक्षाला आपल्या भाषणातून उपहासात्मक तर कधी व्यंगात्मक शैलीने विरोधकांना नामोहरण करण्याची भाषेचा प्रहार करीत असत. त्यांच्या भाषण शैलीत काव्यात्मक शब्दांचे स्वरूप असत तर तितक्याच प्रखरतेने कठोर, घणाघाती आघात करून प्रबोधनाचे स्वरूप धारण होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण हे विचारप्रवाहाचे साधन होते. त्यामुळेच त्यांचा लोकमनाला आवाहन करणार संवाद हा केवळ वाचळ नव्हता, तर तो कृतिप्रवण होता. त्यांच्या भाषणाची शैली लोकशिक्षणाचा वसा घेऊनच प्रकटताना दिसते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीने विचार करणारे राष्ट्रपुरुष होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम घटनेत घेण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. या कलमातील तरतुदी भारतीय संघ राज्याच्या संरचनेत अंतः विरोध होता. या कलमानुसार काश्मीरबाबत भारत सरकारला केवळ परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि दळणवळण याबाबतीत कायदा करण्याचा किंवा धोरणही ठरविण्याचा अधिकार असणारा होता. काशिमीराबाबत इतर कोणताही निर्णय घायचा असल्यास काश्मीर विधानसभेत संमती आवश्यक राहील तसेच ३७०व्या कलमानुसार भारतीय साविंधनातील कोणतीच तरतूद काश्मीरसाठी लागून असणारा नाही. अशा अनेक तरतुदी यात होत्या. मसुदा समितीचे एक सदस्य जे. गोपालस्वामी अय्यंगार यांच्यामार्फत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे कलम घटनेच्या मसुद्यात समाविष्ट केले. पंडित नेहरूंच्या अशा वागण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूपच नाराज झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला न ऐकल्याने ३७०व्या कलमामुळे आजतोवर काश्मीरचा वाद चिघळत होता हे सत्य आपल्याला मान्य करावे लागेल. आता सद्या ३७०वे कलम काढून टाकण्यात आले आहे हे विशेष म्हणावे लागेल, म्हणजेच डॉ. बाबासाहेब जे म्हणते होते तेच खरे ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माची चिकित्सा करण्यासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर आधारित असलेली न्यायाची कसोटी आणि सामाजिक उपयुक्ततेची कसोटी या दोन कसोट्या स्पष्ट केल्या. सामाजिक न्याय आणि उपयुक्तता या दोन कसोट्यांच्या आधारावर त्यांनी हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माचे अध्ययन केले. हिंदू धर्म या दोन्ही कसोट्यांच्या आधारावर खऱ्या उतरत नाही, परंतु या दोन्ही कसोट्यांच्या आधारावर बौद्ध धर्म खरा उतरतो असे त्यांनी आपल्या संशोधनाअंती स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श समाजाची संकल्पना मंडळी हि संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणतात की, माझा आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित राहील. आदर्श समाज हा गतिशील असावा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हि आधुनिक लोकशाहीची मूल्ये आहेत. हि वैश्विक स्वरूपाची मूल्ये आहेत. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मूल्याला आपल्या आदर्श समाजाच्या संकल्पनेत महत्वाचे स्थान दिले आहे. भारतातील समाजव्यवस्थेचे समाजशात्रीय विश्लेषण करूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाहीत तर भारतीय समाजातील विषमताधिष्टीत समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली. १९२० पासून १९५६ पर्यंत त्यांनी भारतीय समाजात बदल घेऊन आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. परंतु त्यांच्या लक्षात आले की, व्यक्तीच्या श्रद्धा, परंपरा बदलल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करताना हे केवळ साधे धर्मांतर नव्हते तर ते एक वैचारिक आणि मूल्यात्मक परिवर्तन होते. चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्थेचा त्याग करून समताधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा तो एक महत्वाचा पैलू आहे. आदर्श समाजाची संकल्पना साकार करण्यासाठी या वैश्विक मूल्यांवर स्वीकार करणे आवश्यक होते. तसेच अपरिग्रह, सत्य, अहिंसा, सदाचार आणि थोर तत्वांचे आचरण सांगणारा बुद्ध धर्म हाच आपल्या समाज बांधवांना अतिशय योग्य आहे असे त्यांना वाटले. या मूल्यांवरच बुद्ध धम्म आधारित आहे याच कारणा मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसोबत नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

प्रस्तुत शोध निबंध यात समाविष्ट असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू हे तेवढेच मर्यादित नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य हा एका विशिष्ट मर्यादित असलेल्या शोधनिबंधात मावणारा विषय नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा नाविन्यपूर्ण असा एक नवा अध्याय होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीचे वैशिट्यपूर्ण महत्व लक्षात घेऊन त्यांनी नवा आशावाद मांडला. देशाला विकासात्मक दृष्टीने दिशा घेऊन भारतीय समजलं लोकशाहीची संकल्पना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनासाठी विचारातून त्यांच्या संशोधनात्मक, चिंतनात्मक दृष्ट्या विचार सरणीतून भारताचा विकास घडून यावा हे ध्येय, उद्दीष्ट्ट होते.

.    .    .

Discus