Image by Gerd Altmann from Pixabay

अंधाराचा तोल सांभाळणारी एक बंद खोली, नकळत जड आवाजात मंत्र ऐकू येत आहे…. 

“ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।” 

आणि दिव्याच्या लखलखत्या प्रकाशात एक मोठा चेहरा, कपाळावर एक मोठी लाल टिक आणि ते भितीदायक डोळे… अक्का मंत्र म्हणत आहे. तेवढ्यात पैंजणाचा आवाज येतो… मंत्रासोबत पैंजणाचा आवाज जवळ येऊ लागतो आणि अचानक दार उघडतो, अक्कांच्या खोलीच्या पडद्यावर एका तरुणीचे प्रतिबिंब दिसते…

“अक्का आती मैं…” प्रतिबिंब चा आवाज येतो. 

अक्का काहीं न उत्तरता, मंत्र उच्चारत फक्त होकारार्थी मान हलवते आणि प्रतिबिंब चालती होते.

हिंदवी कॉलेज, तिथलं शिस्तीचं वातावरण, बघताच तुमचं मन उधाण येईल असं. विद्यार्थी त्यांच्या कामासाठी धावपळ करत आहेत, काही टपोरी मुले गेटवर उभी आहेत. तेवढ्यात एक सुंदर मुलगी त्याच्या समोरून जाते. 

“आईला काय कड्डक माल आहे रे…” एक टपोरी मुलगा होंट एक बाजूला दाबत बोलतो. आणि मित्र ही लाळ टपकावत होकारार्थी मान हलवतो…माञ मुलगी लक्ष न देता सरळ निघुन जाते…

कॉलेजच्या ॲडमिशन हॉलमध्ये सगळे विद्यार्थी ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी शिक्षकाची वाट पाहत गप्पा मारत उभे आहेत आणि तेवढ्यात शिपाई येतो…

“ये चला चला, रांगेत उभे रहा, सर येण्यात आहेत” आपल्याच अंदाजात शिपाई सगळ्यांना सुचना देतो.

आणि सगळेच रांगेत उभं राहण्यासाठी गर्दी करू लागतात, की एक मुलगी (हाव भावनेच थोडी शहाणी) पुढे उभ राहण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तीला जागाच मिळत नाही आणि ती चिडते…

“काका बघाना, हा मुलगा मला मुद्दाम धक्का देतोय” ती मुलगी शिपाई ला सांगते.

“हा, हा बघतोय मी…तुम्हां मुलींना ना फक्त बहाने पाहिजे असतात मुलांना बदनाम करायचे. ठीक आहे एक काम करा मुलांनो तुम्हीं इकडं उभे रहा आणि मुलींनो तुम्हीं इकडं” हाथ दाखवत शिपाई म्हणतो.

आणि पलटणारच की एक कनखर मधुर आवाज येतो…

“आणि मी…?”

सगळेच गोंधळुन त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागतात, एक सुंदर देखणी मुलगी, तिच्या खांद्यावर लटकलेली खादी पिशवी, तिच्या हातात कागदपत्रांची फाईल “दिशा”… शिपाई तीला बघुन जरा गोंधळतो आणि हाताने इशारा करत…

“तु…तुम्ही…इथं दोघांच्या मध्ये ऊभा…? ऊभी…? आ…. इथं उभे रहा” अडखळत शिपाई बोलतो.

दिशा येऊन जागेवर उभी राहिलीच…

“रोहिणी look's she is transgender…” तोंड वाकडं करत ती शहाणी मुलगी बोलते.

“आईला हा तर छक्का निघाला रे…” टपोरी मुलगा ही खिल्ली उडवत बोलतो.

मात्र दिशा काही न बोलता गप उभी असते, आणि धाडधाड पावलांचा आवाज येतो… आपल्या एटित इस्त्री केलेले शर्ट पँट घातलेला ३०-३५ वर्षाचा व्यक्ती येतों…

“सगळ्यांनी ओरिजनल कागदपत्रे आणली आहेत ना… ज्यांच्याकडे असतील त्यांनेच थांबायचं, ज्यांच्याकडे नसतील त्यांनी आत्ताच निघायचं…फुकटचा टाईमपास नकोय…” आपल्या रुबाबात फॉर्म भरणारे सर बोलतात.

ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतात ते आपल खाली मान करुन निघुन जातात…

“चला या…” म्हणत फॉर्म भरण्यासाठी सर बोलावतात.

आता मध्ये दिशा उभी असल्यामुळे कोणीच पुढें जायची हिम्मत करत नाही…हे बघून…

“ये बाय…काय बघते आहेस, जा भर फॉर्म… असंही लेडीज फर्स्ट असतं ना…जा…” म्हणत दिशा पुढाकार घेते.

पुढील मुलगी काहीं न बोलता फॉर्म भरण्यासाठी पुढे जाते…. तीचा फॉर्म भरून होतो आणि पुन्हा आवाज येतो…

“नेक्स्ट…”

पुन्हा तीच गत…दिशा उभी असल्यामुळे कोणीच पुढें होत नाही…

“आता तु काय बघतो बाबा…. जा असंही तुम्हाला मुलीं मागे जायला लय आवडतं ना…जा…” दिशा पुढे असलेल्या मुलाला सांगते.

तो मुलगा ही पुढे होतो, त्याचा ही फॉर्म भरून होतो…पुढील नंबर शहाणी मुलगी आणि टपोरी मुलाचा असतो… ती मुलगी पुढे पाऊल टाकेलच तेव्हढ्यात…

“आता थांबायचं हा…. तुमच्या दोघांमधली तिसरी मी, आता माझा नंबर…” म्हणत दिशा पुढे होते.

ती मुलगी जागीच थांबते. 

“नाव…?”, फॉर्म भरणारे सर विचारता.

“दिशा…” , दिशा उत्तरते.

“लिंग…?” , सर एक नजर दिशावर टाकतात आणि…

“अच्छा…मुलगी…”

“नाहीं सर…othe…” दिशा पटकन उत्तरते

“काय…?” , सर पुन्हा विचारता.

“सर, मी Transgender आहे…” त्या शहाण्या मुलीकडे पाहून दिशात टोमणा मारते.

“काय…?” आश्चर्यचकित होऊन सर विचारता.

दिशा बाजूला नजर टाकून त्या टपोरी मुलाला टोमणे मारत “सर मी छक्का आहे…”.

हे ऐकुन सर अजूनच गोंधळता. 

“बर… शिक्षण…? , पण या आधीच शिक्षण घेतलं आहेस ना…?” स्वतःला सावरत सार विचारता.

“हो सर, या आधीच शिक्षण घेतले आहे म्हणुन तर कॉलेज ला फॉर्म भरते आहे” , म्हणत दिशा उत्तरते.

“पण तुम्हीं लॉक शिकुन काय करणार आहात ना…?” , खिल्ली उडवत सर दिशाला विचारतात.

दिशा मोठ्ठा श्वास घेत “तुमच्या सारख्या लोकांचे विचार बदलणार आहे, माफ करा सर पण कसं आहे ना तुम्हीं तुमच्या मुलाचं भविष्य घडाव म्हणुन चांगलं वातावरण बघता, चाळीतून सोसायटीत जातात, सुशिक्षित एरिया बघतात… अगदी तसेच मला आणि माझ्या येणाऱ्या पिढीला चांगलं वातावरण मिळावं, चांगला समाज मिळावा म्हणुन मी शिकते आहे सर”.

सगळेच ऐकुन अवाक् होता, कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नाही, सरांना तर घाम फुटायला लागतो…

“जात…?”, हिम्मत करून सर विचारता…

“जात, जात काय सांगु सर, लहान असताना माझ्या जन्मदेत्या आई वडिलांनी कचरा डेपोत सोडले, नशिबाने साथ म्हणून मी या माऊलीच्या म्हणजेच माझ्या गुरुच्या हाथी लागली, त्यांने मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, जग दाखवल… वयात येत असताना कळलं की मी हिझडा आहे, तर माझ्या पेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाला, की आम्हीं आमचंच कोणाला तरी मोठ्ठं केलंय. केलंय ते माणुसकीच्या नात्याने, कदाचित एवढी माणुसकी माझ्या जन्म देत्या आई वडिलांत ही नव्हती सर, मात्र माझ्या या प्रती कुटुंबाने पुन्हा जन्म देऊन माणुसकी नावाचा धर्म दिला, तर सर माझी जात, धर्म माणुसकी लिहा ना…” ,मनाचा तोल सावरत दिशा उत्तरते.

सगळेच अजुन अवाक् होता, सरांचा घसाच कोरडा होतो.

तरी सर दिशा ला सांगता “ठीक आहे, तुमचा फॉर्म भरून झाला आहे, तुम्हीं जाऊ शकता…”.

दिशा तेथुन निघते, मात्र सर उभे रहात… “आईक ना…”

पलटत दिशा “बोला ना सर…”

“जाता जाता माझं एक काम करशील का…?” थोड अडखळत सर विचारता.

“हो, बोला ना सर…” दिशा हसत बोलते.

सर खिश्यात हात घालून एक सिक्का काढता, “तुझ्या इच्छेने, हा सिक्का चाऊन देशील का…?”

दिशा हे ऐकुन सरांजवळ येते, त्यांच्या हातातून सिक्का उचलते… सिक्क्याकडे पाहत “सर आमचा चावलेला हा सिक्का तुम्हाला एव्हढा लकी वाटतो ना, तेव्हढच लकी समजुन आम्हाला दत्तक घ्या ना… मालामाल व्हाल…” दिशा सिक्का चावते

 व सरांच्या हातात देऊन आपल्या वाटेला निघते… इकडं सर व बाकी सारे विद्यार्थी एक नजर दिशाला पहात असता…

.    .    .

Discus