enter image description here

दिनांक 24/11/2019 … … हा write up आणि ही तारीख हा निव्वळ योगायोग..

2 आठवड्या पूर्वी किरण गौरट, केतन पवार, रोहित पाटील, मयुरेश म्हाळस आमचं group वर बोलणं झालं की काही मित्र गोरखगड ला ट्रेक साठी जात आहेत आपण पण त्यांच्या सोबत जाऊ आणि मच्छिंद्र सुळका climb करू... सुळक्यांकडून सुळक्यांकडे पुस्तकात माहिती वाचली होती ती एकदा पुन्हा नीट वाचली आणि आम्हा सगळ्यांचा गोरखगड चा ट्रेक 2 -3 वेळ झाला होता..आवश्यक सामानाची जुळवा जुळव केली आणि सकाळी 6 वाजता कल्याण पश्चिमेला दीपक हॉटेलं जवळ भेटलो. सगळे जण यायची वाट बघत 8 वाजून गेले आम्ही 2 तास मागे होतो याचा फटका पुढे बसला. ज्यावेळी आम्ही ट्रेक सुरू करणे अपेक्षित होता त्या वेळेपर्यंत आम्ही कल्याण मध्येच होतो. गोरखगडाच्या पायथ्याला गावी पोहचलो नाश्ता केला दुकानात चौकशी केली (त्या काकांना संगीतलं की आम्ही 4 जण आज जातोय सुळक्यावर 4 च्या आत परत येऊ अस सांगितलं आमचे फोन नंबर दिले आणि निघालो; तेव्हा कळल की यंदाच्या मोसमात (या 2019 च्या पावसाळ्या नंतर) कोणीही सुळक्यावर गेला नाही आहें. त्यामूळे वाट मोडली असण्याची शक्यता होती जास्त वेळ लागणार वाट करत पुढे जायला म्हणून तडक ट्रेक सुरु केला.. ऊन वाढत असल्याने अपेक्षे पेक्षा जास्त वेळ लागला आणि पाणी सुध्दा. सोबत पाणी मोजकेच असल्याने धोक्याची घंटा वाजली होती. जिकडे गोरखगडाच्या पायऱ्या सुरू होतात त्याच्या पुढे जाऊन डावीकडून वाट आहे हे माहीत होता त्याप्रमाणे आम्ही पुढे निघालो. तीव्र उतार आणि वाळलेल्या गवतावरून घसरगुंडी होत होती. Climbing route च्या सुरवातीला पोहचलो तिकडे सगळं समान उतरवलं थोड खाल्लं पाणी पिलं 1 लिटर पाणी खाली ठेवला आणि 2 लिटर सोबत घेऊन आम्ही निघालो...

प्रत्यक्ष चढाई किरण ने लीड केतन 2nd man. नंतर मयुरेश आणि endman रोहित आम्ही आपापल्या कामाला लागलो डोक्यावर तापलेला सूर्य आमचा वेग कमी करत होता. जसे जसे पुढे जात होतो आम्ही alternative leading करत असल्याने पुढचा आरोहक येई पर्यंत वेळ जात होता. दुपारी भर उन्हात रोहित ने सुळक्यावर पोहोचला आणि मागोमाग आम्ही सगळे... सुळक्यावर ज्या झाडाखाली आम्ही बसलो तिकडे आम्हाला summit surprise मिळालं. चापडा साप ... ... नशीब लक्ष गेल 2 मिनिटात आम्ही सुळका उतरायला सुरवात केली.

enter image description here

अर्ध्यावर आलो तेव्हा ट्रेकिंग टीम ला आमच्यासाठी खाली देवळांत पाणी ठेवायला सांगितले त्यामुळे बरं झाल नाही तर जास्तच त्रास झाला असता dehydration चा. किंवा मग गोरखगड च्या टाकी पर्यंत जाव लागला असता पाण्यासाठी...

अमच्यासाठी धडा होता की...

१) वेळ 100 % पाळली गेलीच पाहिजे

२) गरजेपेक्षा थोडा जास्त पाणी आणि खाणं सोबत ठेवा

३) सुळक्याला हात घालायच्या आधी त्या दृष्टीने त्याची रेकी करा

४) control environment मध्ये साराव करा...

५) हे खूप महत्वाचे आहे as one of legendary mountaineer said सशाच्या शिकारीला वाघाची तयारी करून जा..

केतन पवार

15 एप्रिल 2020

ठाणे.

enter image description here

Discus