enter image description here

मार्गे सिंहगड – राजगड- तोरणा- रायलिंग पठार- बोराट्याची नाळ

सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर असणाऱ्या मार्गांपैकी हा एक तंगडतोड मार्ग आणि हे आव्हान पेलणारे, ते विक्रमी वेळेत पूर्ण करणारे अनेक धुरंधर गिर्यारोहक असतील/ होतील/ आहेत.

तसा Range Trek चा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. संघात बाकी सगळ्यांनी range trek या पूर्वी केले होते काही जणांनी हा trek सुध्धा केला होता. एकुणात मीच यात नवखा होतो.

या ट्रेक मध्ये पहिल्या दिवशी आम्ही राजगडावर पद्मावती मंदिरात राहायला होतो. रात्रीच जेवण आणि दुसरी दिवशी सकाळी चहा-नाश्ता साठी एका काकांना सांगितलं होत. ते रात्री १० वाजता आम्हा ८ जणांसाठी जेवण घेऊन आले, बरोबर डाळ, भात, भाजी, भाकरी, ठेचा आणि पत्रावळ सुद्धा हजर होती. आमच जेवण होऊन परत जायला त्यांनी रात्री ११ वाजता गड उतरायला घेतला आणि सकाळी बरोबर ४ वाजता आमच्यासाठी चहा आणि पोहे घेऊन हजर. कस जमवलं असेल त्यांनी हे सगळं. रात्री १० वाजता आम्हा ८ जणांच जेवण घेऊन यायच ११ वाजता गड उतरायचा आणि सकाळी ४ वाजता पुन्हा चहा नाश्ता घेऊन हजर. कदाचित या पेक्षा जास्त जणांसाठी ते हे सगळ घेऊन आले असतील.

जानेवारीच्या थंडीत रात्री गड चढ-उतर करणे आणि काही तासात पहाटे पुन्हा तेच करणे सोबत जेवण आणि चहा-नाश्ता घेऊन.

ते काका घरी कधी पोहचले असतील रात्री; सगळ आवरून कधी अंथरुणावर पडले असतील आणि इतक सगळ करून पुन्हा पहाटे ४ वाजता आमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन हजर.

enter image description here

या सगळ्या पुढे जाऊन विचार येतो की त्या घरातील कर्ती स्त्री तिच काय या सगळ्यानंतर अंथरुणाला अंग टेकणे आणि सगळ्यांच्या आधी उठून स्वतःला कामाला जुंपून घेणे.

किती कष्ट … … !

गडा खाली वाडी वस्ती वर राहणारी अशी किती तरी कुटुंब असतील. जे ही सेवा भटकंती करणार्यांना देत असतील. भटकणार्यांच्या जेवण नाश्ता ची सोय करत असतील.... आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी तुफान कष्ट उपसणाऱ्या सर्वांनाच सलाम … … !

enter image description here

हे सगळ डोक्यात घुमत असतांना मी ट्रेक पुढे सुरु ठेवला होता. आमचा दुसर्या दिवशीचा पल्ला राजगड ते रायलिंग पठार मार्गे तोरणा बुधला माची मार्गे- वाळंजाई दरवाजा- वाळंजाई पाण्याचे टाके- त्रीव्र उतार- गेळगाणी- मोहरी गाव.

enter image description here

आणि शेवटचा दिवस मोहरी गाव ते रायगड (जगदीश्वर) मार्गे बोरट्याची नाळ- लिंगाणा माची- टकमक वाडी- नाणे दरवाजा- महादरवाजा- दारुकोठार– जगदीश्वर.

enter image description here

या संपूर्ण मार्गात जेव्हा जेव्हा पावलं संथ गती मध्ये पडायला लागली तेव्हा तेव्हा हे काका आठवले आणि पावलांचा वेग वाढला आपोआप आणि हा तंगडतोड ट्रेक पूर्ण झाला महाराजांची समाधी आणि जगदीश्वराच्या पायावर डोकं ठेवूनच.

enter image description here

केतन विलास पवार

१५ जुलै २०२० डोंबिवली

Discus