enter image description here

राजे.. तुम्ही एकदातरी परत या. उभ्या महाराष्ट्रालाच काय पण ह्या भारत देशाला तुमची नितांत गरज आहे. तुमच्या नीतिमत्तेची, तुमच्या शौर्यची, तुमच्या शिस्तप्रियतेची आणि तुमच्या अमूल्य मार्गदर्शनाची आम्हा सर्वाना गरज आहे.

राजे.. तुम्ही तर तुमच्या रयतेवर समानपणे प्रेम केलत, रयतेला तुम्ही तुमचं कुटुंब मानलत पण खेदाची गोष्टी आहे कि आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. काही समाजकंटकांनी पूर्ण समाजाची दैना करून टाकली आहे. स्वतःला पुढारी म्हणवून घेणारे फक्त स्वतःचा फायदा बघत आहेत आणि बाकी समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. राजे.. तुमच्या रयतेला तुमची गरज आहे. ह्या समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही एकदातरी परत या...

राजे.. तुम्ही प्रेत्येक परस्त्रीला माते समान मानलेत आणि समस्त स्त्री जातीचं रक्षण केलंत. पण आता मात्र परिस्थिती अशी आहे कि रात्रीचंच काय पण दिवस हि स्त्रियांना घर बाहेर एकट पडणं भयावह झाले आहे. राजे.. तुमच्या छायाछत्राची समस्त स्त्री जातीला गरज आहे. स्त्रीरक्षणार्थ तुम्ही एकदातरी परत या...

राजे.. तुमच्या प्रत्येक गडाला आज तुमची खूप गरज आहे. समाज पुढाऱ्यां सोबत सामान्य जनतेलाहि तुमच्या गडाचं महत्व राहिलेलं नाही. ज्या गडांवर तुमचं अस्तित्व होतं, प्रत्यक्ष तुमची पावले लागली आहेत अश्या गडांची व्यवस्थित जोपासना ही होत नाही आहे. राजे.. सांगताना मन खूप दुखतं पण ते सर्व गढ आज पुनर्रचनेसाठी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकदा येऊन विचारा, गडाचे दगड तुम्हाला त्यांची दैना सांगतील, छिन्न विछिन्न होऊन आस्थाव्यस्थ झालेल्या तोफा तुम्हाला त्यांची व्यथा सांगतील, कोसळून पडलेले बुरुज तुम्हाला तिथली सर्व परिस्थिती सांगतील. राजे.. तुमच्या प्रत्येक गढला तुमच्या उपस्थितीची नितांत गरज आहे. गडाच्या जोपासनेसाठी तुम्ही एकदातरी परत या...

राजे.. तुमच्या मावळ्यांनी निधड्या छातीवर वार झेलले, निडरपणे रणांगणावर शत्रूला सामोरे गेले. तुमच्या शौर्या पुढे शत्रूही आपले शस्त्र टाकत होता. पण आज तुमच्या मावळ्यांना निशस्त्र अवस्थेत असताना, शत्रू, तुमच्याच प्रांतात घुसून त्यांच्या पाठीवर वर करतो आहे. राजे.. अश्या भ्याड शत्रुंना त्यांची सीमा रेषा दाखवण्या साठी एकदातरी परत या...

राजे.. तुमच्या सारखा राजा ह्या महाराष्ट्राला लाभला हे आमचे भाग्य आहे. अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमचे राजे आहात याचा. पण कुठे तरी हि भावना ह्या समाजातून लुप्त होत आहे.

राजे.. एकदाच परत या, नुसतं तुमच्या जयंतीला आणि पुण्यतिथीलाच नव्हे तर तुमची आठवण कायमची तुमच्या रयतेच्या हृदयात ठासून देण्यासाठी आणि ह्या समाजाला आठवण करून देण्यासाठी कि ते तुमचे मावळे आहेत आणि हा उभा महाराष्ट्र अजूनही शिवरायांचा आहे आणि कायम राहणार.

राजे.. तुमच्या सारखा राजा अजूनही झालेला नाही आणि कदापि होणे नाही.. राजे.. तुम्हाला त्रिवार मनाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी.

आभारी आहे
शीतल मंगेश लाड

Discus