enter image description here

पहाटेच्या साखर झोपेत पार्मात्याने पाहिलेल सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे स्त्री;
जेवढा मृदू आणि कोमल तेव्हडंच कणखर व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री;
घराचा भक्कम आधारस्तंभ आणि वात्सल्याने ओतप्रोत भरलेल रूप म्हणजे स्त्री;
ह्या स्त्रीची अनेक रूपे असतात. ती एक मुलगी असते, बहीण असते, सखी असते, पत्नी असते, माता असते आणि ह्या सर्व रूपात ती आपली जबाबदारी एक्दम चोख बजावते.

स्त्री म्हणजे एक असा वृक्ष ज्याच्या छायेत सर्वाना शीतलता आणि शांतता मिळते. सर्व ऋतू स्वतः सोसून सर्वाना फक्त शीतल छायाच देणारा वृक्ष म्हणजे स्त्री.

पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतःचं अस्तित्व कौशल्याने आणि संघर्षाने टिकवून ताठ मानेने समाजात वावरणार एक भक्कम व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री.

अशी हिं सामर्थ्यवान स्त्री पुत्र रक्षणासाठी हिरकणी बनते. क्षेत्र रक्षणासाठी हातात तलवार घेऊन लढणारी झाशीची राणी बनते. स्वराज्य स्थापनेसाठी स्वःपुत्राला मार्गदर्शन करणारी वीर माता जिजाऊ बनते. स्त्री शिक्षणासाठी झटणारी सावित्रीबाई फुले बनते. थेट अंतरात पोहोचून देशाचे नाव जगभरात गाजवणारी कल्पना चावला बनते. सर्वस्वाचा त्याग करून समाज कल्याणासाठी स्वतःचं जीवन अर्पण करणारी मदर तेरेसा बनते. आणि वेळ पडल्यास यमराज सोबत भांडून स्वतःच्या पतीचे प्राण परत घेऊन येणारी सत्यवनाची सावित्री बनते.

अशी हि स्त्री एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे आणि आज आपण ह्या स्त्री शक्तीचा इथे सन्मान करणार आहोत.

कुठलंही कार्य मग ते छोटं किंवा मोठं असो.. करायचं म्हटलं कि त्यात स्त्रियांचा समावेश असतोच. खरं तर स्त्रीचा हाथ लागल्याशिवाय कुठल्याहि कार्याला आकार येत नाही, पूर्णता येत नाही आणि असे अनेक उपक्रम आहेत तिथे स्त्रियानी खूप कुशलतेने आणि कलात्मक रित्या त्या कार्याला पूर्णता दिली आहे. मोठेपणाची जराहि इच्छा न बाळगता कायम पडद्या आड राहून त्या कामं करतच असतात. मग ते समाज कार्य असो, बाळ कल्याण उपक्रम असो किंवा मोठा उत्सव साजरा करायचं असो. स्त्रिया अविरत कष्ट घेतच असतात. विविध क्षेत्रातील ह्या स्त्रियांना आज समाजा पुढे आणून आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करणार आहोत..

Discus