Source: Aliceabc0 from Pixabay

बावरा होऊन हरवून जातो तुझ्यात मी,
विसरून साऱ्या जगाचे बंधनं स्वतःला ही विसरतो मी।।

कधी कुठे कसा शोधू तुझ्यात हरवलेलो मी हेच मला कळेना,
तुला बघून मला काहीच कसं सुचेना??
तो सप्त रंगांचा इंद्रधनुष्य ही तुझ्या रंगा पुढं कुठं चमकेना।।

तुझ्या मनात पोहोचायला मला वाटच कुठं दिसेना,
तुला बघून मला काहीच कसं सुचेना??
चंद्रात, ताऱ्यात शोधतो तुला रात्रीच्या शांत सागरात मी,
घेऊनी सोबत तुला चाललो होतो स्वप्नांच्या दुनियेत मी,
तो पुनवेचा चंद्र सुद्दा तुझ्या पुढं काहीच वाटेना,
तुला पाहिल्याविना माझ्या दिवसाची रात्र ही होईना,
तूच आहेस माझ्या प्रश्नाच उत्तर सांगना,
तुला बघून मला काहीच कसं सुचेना?

.    .    .

Discus