Photo by Sooraj Perambra on Unsplash
एक कष्टाळू शेतकरी, त्रासलेला होता
दुष्काळाचा दुष्परिणाम, त्याचा गहू-बाजरिचा शेत नासला होता
तळे विहिरिंमध्ये पाणी नव्हते थेंबभर
कोरड्या जमिनिप्रमाणे भेगा दिसू लागल्या होत्या देहावर
मोकळ्या वावरात अपयशाच्या झळा पसरल्या
गाई गोठ्यात चाऱ्यासाठी तरस्ल्या
दिवसेंदिवस किंमत ढासाळु लागली बाजाराचि
अवस्था दयनिय होऊ लागली होती त्या शेतकऱ्याची
कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन तो वावरत होता
कुटुंबीयांचा चेहरा बघून स्वतःला सावरत होता
न राहायला छप्पर, न काही सुख-सुविधा
मग एवध राब-राब करून कुणाचा फायदा?
न मुलांना अन्न, आणि न त्यांना शिक्षण
एके दिवशी विचार करताना डोळ्यात पानिच आले टचकन्
ज्याच्यामुले रोज अन्न मिळते खायला
त्यालाच आज कोणी तयार नाही मुलगी द्यायला
सरकारहि धोरने बजावुन पाठ फिरून घेते
मग सहाय्यासाठी त्याने कुणाकडे पाहायचे?
जेव्ह परमेश्वरानेहि साथ न देण्याचा विचार केला आहे, असे भासले
आणि दुसरा कोणताहि पर्याय आता दिसत नाही, असे वाटू लागले
तेव्हा त्याने टोकाचा निर्णय घेतला
आणि परिस्थितीचा परिणाम जीवावर बेतला
आता काय करावा त्या हारलेल्या बायकोने ?
मुलांचे भोळसठ डोळे जेव्हा बघतात आशेने
असं कसं सोडून जाऊ शकतो तो एकटीला?
असं कसं सोडून जाऊ शकतो तो एकटीला?
एकाच गावातल्या या चार गोष्टी
मग तिच्या मुलांचे दुःख बघून कधी रडेल हि सृष्टी?
कधी येइल सरकारला त्याची दया?
कधी येइल शेतकरी या नावाला पहिल्यासारखि रया?