ज्या विश्वासाने मी आपल्या जनतेच्या मनोमनात आपुलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते सगळे प्रयत्न निस्वार्थ मनाने माझ्या जनतेला पटलेले नाही असे मला वाटते.
याचे कारण असे की, ज्या जनतेला मी आपले मानले पण ते माझ्या विचारांशी दुरवलेत, जिथे सगळ्यांना आपल मनायच तिथे आज आपलेपण डोळ्यांना दाखवून घरोघरी तो या जातीचा, तो त्या जातीचा असे कुजबुजतात.
ज्या मोठेपणाचा मी अधीन झालो नाही ते मला देऊन माझ्या विचारांची गर्जना दाबून तकलित तुम्ही!
ज्या स्त्रियांना मी आईं म्हणायचो त्यांच्या आब्रु-वर नजर टाकून तुम्ही माझ्या नाजरांवर नजर टाकून तुम्ही जय भवानी ! जय शिवाजी ! म्हणता. माझ्या नजरा तर तेव्हाच खाली केल्या.... त.
मला तेव्हादेखील इतका त्रास झालेला नव्हता जेव्हा औरंग्याने स्वतः भट्टी पेटविला आणि सळ्या तळपत्या होण्यासाठी भट्टीत टाकल्या.त्याच्या सेवकाने माझ्या नेत्रकमलावर त्या सळ्या खुपसल्या... ती बुबुळे, डोळे तेंव्हा गेले पण आज माझ्या डोळ्यांचा तेज आपोआप गेला!
जे शब्द मी कधीच उच्चारले नाहीत . आपल्या भावांना, रयतेला स्त्रियांना ते शब्द आज तुम्हाला प्रिय झालेले आहेत. औरंग्याने तर फक्त माझी जीभ छाटली पण शब्द माझ्या रयतेनेच माझ्यापासून हिरावून घेतले. डोळे काढले, जिभ छाटली आता... आता फक्त ऐकताच येत होते म्हणून कानामध्ये गरम - गरम शिसे ओतण्याचा निर्णय औरंग्याने घेतला व शिसे उकळण्यासाठी भट्टीवर ठेवण्यात आले.
(१० मार्च १६८९) माझे मुंडके वाकडे करून गरम शिसे दोन्हीं कानात ओतण्यात आले. गरम - गरम... प्रचंड गरम! वेदनेने मला विव्हळताही येईना. माशाप्रमाणे तडफडू लागले व दुसऱ्याचं दिवशी जीवही जाईना. त्या वेळेला मला वाटत होते माझ्या प्रजेचे डोळे म्हणजे माझे डोळे, माझ्या प्रजेचे बोलणे म्हणजे माझे मुख आणि तुमचे कान म्हणजेच माझे...
माझ्या अंगावरची साल मोसंबीच्या टरफलासारखी सोसली जावी म्हणजेच मी आपोआप मृत्युमुखी पडेल असे औरंग्याला वाटे. त्याप्रमाणे कातडे उसायला सुरवात केली संपूर्ण अंगावरील कातडी काढल्यानंतर गरम मिठाचे पाणी फेकण्यात आले. शरीराचा दाह - दाह! झाला.... त्यानंतर माझे व कवी कलशाचे हातपाय एक एक करून तोडण्यात आले.
(११मार्च १६८९) औरंग्याला वाटले माझा मृत्यू झाला. पण जो पर्यंत माझी प्रजा आहे तो पर्यंत मी कसा मृत्यूमुखीं पडणार !!
आज मला वाटते, ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी स्क्रियांची आब्रू लुटताहेत, आपलेपण नसून फक्त जतीप्रथा- राजनीति चालू आहे, माणसाला माणुसकीची जाण नाही, स्वाभिमानाला मान नाही. ज्या मातीवर जन्मलो त्या मातीवर आता धर्म - जाति, राजनीति, कुटनिती... सगळे विचार मृत्युमुखी पडले. अरे... माणुसकी तरी राहली नाही.
म्हणून मला आता वाटते खरोखर मी आता मृत्युमुखी पडलो. माझा मृत्यू हा औरंग्याने नाही माझ्या प्रजेचे, माझ्या विश्वासू रयतेने केला... याची साक्ष तूम्ही सगळे! तुमचे आचार - विचार बोलणे आहे.