बदल हा मानवी जीवनात एक घटक अन् निसर्गाचा नियमच आहे. स्वातंत्र्य काळात रेडीओ, ६०-७० च्या दशकात दूरदर्शन, ८० च्या दशकात संगणक, ९० च्या दशकात केबल आणि आज २१ व्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉटस्अॅप, ब्लॉग, ट्विटर अशी अनेक प्रसारमाध्यमे मानवाच्या हाती आली. आज ही प्रसार माध्यमे म्हणजे सोशल मीडीया मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालली आहेत. आज मानवाला प्रसारमाध्यमांशिवायचे जीवन निरस वाटत असावे. हे झालेले बदल मानवासाठी वरदान तितकेच शाप ही ठरले. आज त्याच्यामुळे सारा जमाना ऑनलाईन झाला आहे.
ऑनलाईन झालाय सारा जमाना
तू अन् मीही ऑनलाईन हाच याराना,
नाती जपण्यासाठी मोबाईलच हवा
या सोशल जगतात कुठे आहेस तू देवा ?
भावनांचा रेट झालाय लो नाती जणू जस्ट फॉर शो!
आज सोशलमीडीया / प्रसारमाध्यमांमुळे अनेक फायदे झाले पण म्हणतात ना, 'कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात; सकारात्मक अन् नकारात्मक'. पण प्रसारमाध्यमांचा समाजावर झालेला परिणाम विसरता कामा नये. आपल्याला वाटते प्रसारमाध्यमांतून आपले मनोरंजन होते, पण एखाद्या चुकीच्या क्लिकवर दंगली देखील होऊ शकतात. समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस | लागू शकते. तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्तारामुळे वैचारिक क्रांती झाली पण आज घरबसल्या मिळत असलेल्या सोयी-सुविधांमुळे माणूस परावलंबी झाला आहे. तो समाजापासून दुरावला गेला.
प्रसारमाध्यमांमुळे शेती ते उद्योगधंदे, समाजकारण ते राजकारण आणि शिक्षणापासून विज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रात प्रगती केली पण ही प्रगती चांगल्या कारणासाठी न वापरता घोटाळे, फसवेगिरीसाठी वापरली जात आहे, ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कधी-कधी समाजात अफवा पसरवण्यासाठी काही लोक प्रसारमाध्यमे आजमवतात. राजकारणात देखील प्रसारमाध्यमे खूप मोठी कामगिरी पार पाढतात. शिक्षणातील वापरामुळे विद्याथ्यांमधील स्वयं अध्ययन अध्यापनाची सवय आज पूर्णपणे नष्ट होऊ लागली आहे.
प्रसारमाध्यमे आहे पर्वणी छान
पण समाजावर झाला वाईट परिणाम।
एका क्लिकने केले सगळ्या जगाला जवळ,
अन् समाजाशी तोडला त्यांनी संबंध निव्वळ
अशा प्रकारे प्रसारमाध्यमांचा समाजावर काही अंशी नक्कीच चांगला, सकारात्मक परिणामही झाला पण बरोबरच अनेक नकारात्मक परिणामही झाले. अनेक गुन्हेगारी प्रवृतना चालना मिळाली. सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले, हे विसरता कामा नये. अशा रीतीने प्रसारमाध्यमे नावाच्या रोगाला काही लोक खूप गंभीर रीतीने बळी गेले असे म्हणणे देखील चुकीचे किंवा वावगे ठरणार नाही.