या माझ्या भारत देशात,
कधी बनेन मी निर्धास्त ? ॥धृ॥
वय हे खेळण्याचे,बागडण्याचे
वासना बनले मी नराधमांची,
माझ्या आया-बहिणींची सुरक्षितता
आहे गरज काळाची ||१||
या माझ्या भारत देशात...
रोजरोज ऐकाव्या लागतात
बातम्या दुःखमय,
ऐकून मनात विचार आला
किती आलाय अन्यायाचा प्रलय||२||
या माझ्या भारत देशात...
मनोमन आहे इच्छा,
महिलांच्या जीवनाला नवी आशा मिळावी,
कायदा-सुव्यवस्था कडक होऊन
अपराधयाांवर जरब बसावी ॥३॥
या माझ्या भारत देशात....
मला बनायचे नाही पिडीत
मला बनायचे आहे रणरागिणी,
बहिणींनो,हाती घेऊन मशाल क्रांतीची
मर्दालाही लाजवेल अशी घडवू मर्दानी ॥४॥
या माझ्या भारत देशात...