Image by Silvia from Pixabay
अशी चालताना वाट ती दुःख वेदना ही होत होत्या
पाऊलाच्या पाऊलखुणा मझ आस दाखवत होत्या
शब्दांनी घाव केला
तीर हदयी मारला
आस होती जगण्याची
जीव तो असा कोंडला
जीभ ती बोलते काही
शिवीगाळ वैरी घालतो
हाक ती वैकूंठातली
यमदूत मझ बोलवितो
जगताना माणसाने वैर
केले माणसाशी सदा
कष्ट गेले दुःखात न्हावूनी
घाम तो मळ अंगी सदा
मोह सहवासाला धरला
पुरूषाने पदर बाईचा
मग्न झाली दोनमने
विरह उध्दार देहाचा
संपला संसार हा संस्कृती
चालली तलवार ती अपघाती
मृत्यू हे नक्की मरण आहे
श्वास हा निमित्त नियती मानती