सुख हे कळले माणसाला इथे
जीवन अपुले अधुरे
जगु लागलो
गावकुसाबाहेर कसे ?
अन्याय सोसूनी विरोधकांना हरवूनी
...

झुंज ही संघर्षाची प्रतिकार क्रांतीची
मशाल ही समविचाराची पेटली मनी
लढा हा सत्याचा प्रत्येकासाठी
निळा आज फडकला आकाशी
आकार हा जीवनाला देऊनी
....

बा!
तुझ्या जन्मामुळे
आम्ही माणसात आलो
"जय भीम"
नारा पुन्हा पुन्हा मुखातून येतो
....

आग ती पेटली पाण्याला
चवदार तळ्यावर
रायगडच्या पायरीवर मनुस्मृती जळवूनी
आणिले माणसाला बुध्दाच्या चरणी
....

बुध्दम् शरणम गच्छामि
धम्मम् शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि

.     .     .

Discus