Photo by Nandhu Kumar: pexels

सतत गजबजलेली दुनिया एक दिवस अचानक थांबली,
परिवारा पासून दूर उडून गेलेल्या पिल्लांनी सुद्धा; आपल्या घरट्याची वाट मात्र तेव्हा धरली.

आईला तेव्हा पिल्लं घरट्यात एकत्र असल्याचं सुख लाभलं,
पिल्लांनी आज शेवटी हॉटेलचा सोडून आईने बनवलेला पोटभरून खाल्लं.

बाबांची पिल्लं बाहेर असल्याची चिंता थोड्या काळासाठी का होईना पण ती सुटली,
घरच्यांचा हातभार लागला म्हणून आईची कामं थोडी फार मिटली.

लहापणीचे जपून ठेवलेले खेळ कितीतरी वर्षांनी पुन्हा खेळता आले,
कुटुंबा सोबत हि खेळण्याची वेगळीच मज्जा असते ते पिल्लांना आता कुठे जाऊन समजले.

लॉकडाऊनच्या काळात परिवाराशी एक घट्ट नाते जुळले,
बाहेर संकट येतं तेव्हा देवा आपुले घरटेच चांगले, हे उशिरा का होईना पण पिल्लांना ते उमगले.

.     .     .

Discus