आयुष्य! मग ते कोणाचंही असो, प्रत्येकाची आपली एक स्वतःची गोष्ट असते.

आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे.

तस माझं वय काही दिवसांचंच आहे आणि आता मी मला या डब्ब्यात लावलय तिथं पर्यंतचा माझा प्रवास तुम्हाला सांगतो.

माझ नाव बहावा. मला येणाऱ्या सोनेरी रंगाच्या फुलांमुळे मला “Golden Shower Tree” म्हणून सुद्धा ओळखल जात. माझ्या पूर्वजांच्या सौंदर्याने मोहित झालेल्या माझ्या एका मित्राने डोंबिवली येथून माझ्या काही शेंगा मिळवल्या आणि त्यापासून बिया वेगळया केल्या. त्याच्या परिचयातील काही लोकांना त्याने ह्या बिया दिल्या आणि काही स्वतः जवळ ठेवल्या. अनेकांनी त्या बियां पासून रोप सुध्धा तयार केली. या बिया गोळा करणे आणि त्या प्रत्यक्ष मातीत लावणे या साठी १५-१८ महिने त्याने वाट पाहिली. पण या काळात तो जिथे जिथे गेला तिथे तिथे माझे सगे सोबती त्याचं लक्ष वेधून घ्यायचे आणि माझा हा मित्र आनंदून जायचा; माझा डौल आहेच असा सुंदर. त्याच्या सोबत्यांना पण तो बहावा या झाडाची ओळख करून द्यायचा.

enter image description here

ह्या कोरोना संक्रमणामुळे असणारी टाळेबंदी माझ्या पथ्थ्यावर पडली आणि या मित्राने त्याची बियाणांसाठी केलेली बरणी बाहेर काढली आणि आता मी त्या बरणीतुन वाटीत आलो. आठवडा भर मला भिजत ठेवलं गेलं. आणि मग मला खास तयार केलेल्या पिशवीत रोवलं आणि वर माती पसरुन दिली. याला बरेच दिवस झाले, बी अंकुरली होती पण मातीच्या पृष्टभागावर याची काही लक्षणं दिसत नव्हती. मी काही एकटाच बी अवस्थेत नव्हतो माझ्या सोबत अनेक बिया पण होत्या. आम्ही सगळे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होतो. शेवटी कंटाळून त्याने सगळ्या पिशव्या रिकाम्या केल्या. हे करत असतांना एक बी अंकुरलेली त्याच्या लक्षात आली. मग त्याने एका वेगळ्या पिशवीत मला लावलं. इथे त्याने एक गडबड केली आणि मला उलट दिशेत लावलं पण नशीब त्या पिशवीला पाणी बाहेर जाण्यासाठी असलेल्या छिद्रातून बाहेर येण्यासाठी मला जागा मिळाली. काही दिवसांनी या मित्राचे इकडे लक्ष गेल पण तो पर्यंत कमी जागेमुळे माझे दोन भाग झाले होते.

आता पुढे काय होईल माहित नव्हते. त्याने ती पिशवी फाडून मला त्यातून मोकळे केले आणि माझे जे दोन भाग होते त्यातला मुळा कडील कडील भाग या डब्ब्यात लावला आणि वरील अर्धा भाग तसाच तिथे डब्ब्यात ठेवून दिला. २-३ दिवस झाले. जो भाग मातीत लावला होता त्यावर कोणतेच जीवन असल्याचे लक्षण न्हवते पण जो वरील भाग तिथेच पडला होता तो मात्र ताजा टवटवीत होता. त्याला काय वाटल काय माहित, त्याने जशी एखाद्या झाडाची फांदी लावतात. तसा जो माझा अर्धा भाग उरला होता तो पण त्याच्याच बाजूला मातीत लावला; आणि काय आश्चर्य: चक्क मला इवली इवली पानं आली.

enter image description here

जेव्हा पासून मला या नवीन डब्ब्यात आणून ठेवलाय, तेव्हापासून दररोज हा मित्र माझ्याशी बोलतो, गप्पा मारतो, माझी विचारपूस करतो, मला सांगतो दोस्ता लवकर मोठा हो मस्त डौलदार तोच रुबाब तेच आश्चर्य आणि तीच सुंदरता. मी पण आता खूप उत्सुक आहे मला लवकर मोठठ् व्ह्यायचंय; भरपूर फुलांनी बहरायचंय; प्राणी-पक्ष्यांना अंगावर खेळताना बघायच आहे....तुम्ही पण मस्त खुश रहा .....

भेटूया लवकरच .....

केतन विलास पवार.

डोंबिवली ,१० ऑगस्ट २०२०.

Discus