Photo by Jeffrey Paa Kwesi Opare: Pexels

आपण सर्वांनीच हा अनुभव घेतला असणार. बरेचदा थोडक्यात आपल्याला जे पाहिजे असतं ते मिळता मिळता राहतं किंव्हा खूप प्रयत्न करूनही काही गोष्टी आपल्याला जेव्हा पाहिजे असतात तेव्हा न मिळता नंतर कधीतरी मिळतात.

खरंच, वेळे आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नसतं. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा निसर्ग प्रत्येकाला ज्याचं त्याचं नशीब लिहून जन्माला घालतो. काही लोकांच्या नशिबात सुरुवातीला खडतर प्रवास असतो तर काहींच्या नशिबात थोडा उशिरा, पण प्रत्येकाच्या नशिबी संघर्ष हा असतोच. काहीजण या संघर्षाला सकारात्मक नजरेने बघतात तर काहीजण अडचण म्हणून, तो प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. पण या जगात निसर्गाने कोणालाही सोपं असं आयुष्य किंव्हा संपूर्ण आनंदी आयुष्य दिलेलं नाही आहे.

आपण सर्वजण खूप मेहनत घेतो, स्वप्न बघतो, आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याशी करतो आणि त्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत राहतो ज्या आपल्यासाठी बनल्याच नाही आहेत. आपल्या सर्वांचं काही ना काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण वाहवीत ही आपल्या सर्वांची इच्छा असते आणि ते योग्यही आहे पण कधी कधी आपण एवढा हट्ट धरतो की ती गोष्ट आपल्याला ताबोडताब पाहिजे असते आणि नाही मिळाली तर मानसिक त्रास करून घेतो आणि आपलं सुंदर आयुष्य कठीण बनवतो.

आपल्या नशिबात जी गोष्ट लिहिली आहे ती आपल्याला मिळण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही पण ती गोष्ट आपल्याला कधी मिळेल हे आपल्या हातात नाही आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपलं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. फक्त कर्म करणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. सकारात्मकतेने आपण आपल्या आयुष्यात जर पुढे जात राहिलो तर हळू हळू निसर्ग आपल्याला आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्याची संधी नक्कीच देतो.

निसर्गाला आपल्याला भरभरून देण्याची योग्य वेळ माहित असते आणि त्याला कधीच challenge नाही करायचं कारण तो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या वेळेला सगळ्या गोष्टी देतो, आपल्याला फक्त संयम ठेवायचा असतो आणि आपलं काम चोखपणे करायचं असतं. स्वप्न नक्कीच बघा, ती पूर्ण करण्याचा प्रयत्नही करा पण ती त्या वेळेलाच पूर्ण वाहवीत हा हट्टाहास धरू नका. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात.

आता हे एक उदाहरण बघुयात. एकदा एक व्यापारी सुट्टीसाठी परदेशात जायचं ठरवतो. त्याचा हा पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे तो खूप खुश असतो. खूप वर्षाच्या नियोजनानंतर त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार असतं. सगळी तयारी करून तो टॅक्सी मध्ये एअरपोर्ट ला जायला निघतो पण मधेच त्याची टॅक्सी बिघडते आणि सुमसान रस्ता असल्यामुळे त्याला दुसरी टॅक्सी ही मिळत नाही. तो देवाचा खूप धावा करतो, एअरपोर्ट वर वेळेत पोहचू नाही शकणार यामुळे खूप स्ट्रेस घेतो. काही वेळे नंतर त्याला टॅक्सी मिळतेही, तो एअरपोर्ट वर कसा बसा पोहचतो पण त्याची flight चुकते. एवढ्या वर्षाची मेहनत आणि संयम त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि त्याला खूप वाईट वाटतं. हतबल होऊन तो घरी जातो पण रात्रभर त्याला झोप लागत नाही. तो सारखं निसर्गाला दोषी ठरवतो आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत झोपी जातो.

सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा त्याला कळतं की ज्या flight ने तो जाणार असतो त्या flight चा अपघात झाला आहे आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग उभा राहतो. काही वेळेपूर्वी जो निसर्गाला नावं ठेवत होता , जो स्वतःच्या नशिबाला दोष देत होता तोच आता निसर्गसमोर नतमस्तक होऊन त्याचे आभार मानत असतो.

वेळे आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नसतं आणि हाच निसर्गाचा नियम आहे. निसर्गासमोर आपण कधीच हट्ट धरू नये कारण आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे त्याला जास्त माहित असतं. तुमच्या भाग्यात जे लिहलं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार पण योग्य वेळी आणि जेवढं लिहलं आहे तेवढं मिळणार. संयम, कर्म आणि अनुशासन या सर्वांची आपण काळजी घेतली तर निसर्ग आपली नक्कीच काळजी घेणार.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदरच ठेवा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांचा मनमुरादपणे आनंद घ्या. प्रत्येक क्षण जर आनंदाने साजरा केला तर कुठलाही संघर्ष हा सोपा वाटायला लागतो आणि त्यातनं आपल्याला बरंच काही शिकायलाही मिळतं. स्वतःवर आणि निसर्गावर विश्वास ठेवा.

.    .    .

Discus